माझ्या दौऱ्याची राज्य सरकारने धास्ती घेतली की काय अशी टीका पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्य सरकारवर केली.

पालघरच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागल्याने त्यांनी हे वक्तव्य केले. पालघरमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा नियोजनशून्य कारभार या निमित्ताने पहावयास मिळाला, असा टोलाही भारती पवार यांनी या वेळेस लगावला. माझ्या दौऱ्यात राज्य शासनाने आकस ठेवून मला सुविधा पुरविली नाही, सुविधा पुरविणे हे त्यांचे काम होते. मात्र तसे झाले नाही, असे आरोपीही त्यांनी यावेळी केले.

माझा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारींनी मला भेटणे अपेक्षित होते. जिल्ह्याची माहिती देणे अपेक्षित असताना तसे त्यांनी केलेले नाही. किमान जिल्ह्याची माहिती त्यांनी दिली असती तर जिल्ह्याच्या विकासासाठी मला प्रयत्न करता आले असते व आढावा घेता आला असता. मात्र महितीअभावी ते करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या दबावाखाली येऊन जिल्ह्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणांनी माझी भेट व आमचा दौरा टाळल्याचा आरोपही शेवटी भारती पवार यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारती पवार पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहिल्याच दिवशी त्यांनी पालघरमधील हुतात्मा स्तंभ या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन करत आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मनोर येथील वाघोबा खिंड परिसरातील आदिवासींची दैवत असलेल्या वागोबा मंदिराचे दर्शन घेतले व तेथून मनोर व पुढील दौऱ्याला निघाल्या आहेत.