पालघर : मिती ग्रुप आणि स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. ज्योती ठाकरे यांच्या सहकार्याने श्रावण महोत्सव २०२५ अंतर्गत पालघर जिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय पाककला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
“ब्रेकफास्ट म्हणजेच न्याहारीचे शाकाहारी व पौष्टिक पदार्थ” हा स्पर्धेचा विषय असून ही स्पर्धा १ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते संध्याकाळी ६.३० या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे कै. मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह, माहीम रोड, पालघर येथे होणार आहे. सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
स्पर्धकांनी घरूनच न्याहारीचा पदार्थ तयार करून आणणे आणि आकर्षक पद्धतीने सादर करणे तसेच पदार्थाची माहिती परीक्षकांसमोर मांडणे या अटी स्पर्धांसाठी अनिवार्य आहेत.स्पर्धकांकडून चवदार, पौष्टिक, झटपट बनणारा व सर्वांना परवडणारा शाकाहारी पदार्थ तयार करण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेत ५ उत्कृष्ट स्पर्धकांना बक्षिसे व राज्यस्तरीय फिनालेसाठी थेट प्रवेश, त्यानंतर ३५ स्पर्धकांना विशेष बक्षिसे, तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व बक्षिस दिले जाणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांची पर्वणी असल्याचे आयोजकाने या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून खालील संपर्क क्रमांकांवर नोंदणी करता येईल
- अनुजाताई तरे – 7387332248
- नमिताताई राऊत – 9967279022
- रेखाताई बागुल – 9022235587
- चंदनाताई जाधव – 9172338276
या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवा आणि सर्वोत्कृष्ट ठरून दुबई, बँकॉक, पट्टाया ची मोफत सफर करा, असे आवाहन श्रावण महोत्सव टीममार्फत यावेळी करण्यात आले.