पालघर : पालघर तालुक्यातील शिरगाव व सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक चा कचरा घेऊन लागला असून त्यामुळे किनाऱ्याचे विदृपीकरण झाले आहे. या मुळे गणेश भक्तांना विसर्जनासाठी अडथळा निर्माण होणार असून ग्रामपंचायतीने किनारा सफाई चे काम हाती घेईल ते आहे.
पालघर शहरातील तसेच परिसरातील अनेक श्री गणेशाचे विसर्जन शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत चार ठिकाणी केले जाते. शिरगावच्या उत्तरेच्या बाजूला असणारे कै. य.य. निजप हायस्कूलच्या लगतच्या किनाऱ्या भागापासून सातपाटीपर्यंतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, चप्पल, कपडे युक्त कचरा लागला असून निजाम हायस्कूलच्या मागे व माळी स्टॉप मागे असणाऱ्या दत्तमैदान या विसर्जन ठिकाणावर प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर लागल्याचे दिसून आले आहे.
कचरा सफाईसाठी काही दिवस पावसाचा अडथळा आला असला तरी पावसाने उघड घेतल्याने शिरगाव ग्रामपंचायतीने किनाऱ्यावरील कचरा सफाईसाठी असणारे स्वयंचलित कचरा सफाई मशीनचा वापर सुरू केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील यांनी दिली आहे. किनारा भागात मर्दा वेल पसरला असून त्यामध्ये असणारे प्लास्टिकचे तुकडे काढण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासत असून सफाईच्या कामाला या वेल व झाडाझुडपांसह पावसाचा अडखळ येत असल्याची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत शिरगाव येथे असणाऱ्या चार विसर्जन ठिकाणांपैकी दोन ठिकाणा स्वच्छ असून उर्वरित दोन ठिकाणांची स्वच्छता पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल असे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.
सुरुच्या बागेत मद्यपी
सुरुच्या बागेत मद्यपींचा वावर वाढल्याने समुद्र किनाऱ्यावर अस्वच्छता पसरत आहे. अनेक मद्यपी पर्यटक समुद्र किनारी सुरुच्या बागेत येऊन पार्टी करीत असल्याने प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पडत असतो. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून पर्यटकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.