कासा: पालघर जिल्ह्यात जव्हार मोखाडा या आदिवासी ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीया चा सण आखाती या नावाने ओळखला जातो या सणाच्या दिवशी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकरी तरुण आपल्या पारंपारिक पद्धतीने अक्षय तृतीया हा सण साजरा करतात या सणाच्या दिवशी आपल्या हयात नसलेल्या पूर्वजांना पारंपारिक पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर गनुर मिरवणूक काढली जाते अक्षय तृतीया सण असल्यामुळे बाहेर कामाला गेलेले स्थलांतरित झालेले सर्व आदिवासी बांधव आपल्या मूळ गावी आले असून पारंपारिक पद्धतीने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
प्रत्येक समाज हा आपापल्या परीने प्रत्येक सण जसा आनंदाने साजरा करतात तसा आदिवासी समाजबांधव हा निसर्ग पूजक आहे.अनेक परंपरा, चालीरीती तसेच अनेक सण वर्षानुवर्षे साजरा करत आलेत आणि करत असतात. तसाच आखाती हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. वर्षाचा शेवटचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. विक्रमगड, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी भागात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक भागत अनेक चालीरिती थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या बघायला मिळतात.
जेवण झाल्यानंतर गौराई चा कार्यक्रम केला जातो. त्यासाठी गावातील सगळेजण मंदिरात जमा होतात. गवूर म्हणजे सात प्रकारचे धान्य हे पेरले जाते. त्यामध्ये नागली, वरी, भात, उडीद, तुर, कुळीद, मका इत्यादी प्रकारचे धान्य हे नऊ दिवस आगोदर पेरले जाते. गौराईला नऊ दिवस रोज सकाळ संध्याकाळ पाणी घातले जाते. व नवव्य दिवशी म्हणजेच आखाती च्या दिवशी चौरंग पाटावर ठेवून पूजा केली जाते. त्यानंतर गावातील सर्व गौराई मंदिरात जमा केल्या जातात तिथे गावातील सर्व लोक आपापल्या परीने त्यांची पूजा करतात हे सर्व झाल्यावर सर्वजण आपापल्या गौराई घेऊन गावात मिरवणूक काढतात. नाचत , गौराई ची गाणे म्हणत मस्करी
करत आनंदाने गौराई ची मिरवणूक सांबळ वाजवत काढता. हे झाल्यानंतर संध्याकाळी तलाव, विहिरीवर, नदी किंवा नाल्यावर घेऊन जातात व तिथे वाळूवर राक्षसाची प्रतिमा काढतात व त्यांना बेंड्या, राया खइस इत्यादी नावे देतात व गौराई बुडवली जाते गौराई वरून यावर्षी पीक कसे येईल याचा अंदाज बांधला जातो. असा हा गौराईचा शेवटचा सण म्हणून साजरा केला जातो गौराईला नवविवाहित सणाला माहेराला येत असतात.अश्याप्रकारे हा सण ग्रामीण आदिवासी भागात साजरा केला गेला.
अखात्या सण (अक्षय तृतीया).
अखत्या सण आदिवासी समाजाचा पहिला सण म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आदिवासी कोकणा समाजात विशेषकरून हा सण साजरा करण्यात येतो.हा सण वैज्ञानिक दृष्ट्या फार महत्त्वाच्या आहे. आदिवासी माणसे सणाच्या सात ते १५ दिवस अगोदर एका टोपलीत धान्य पेरून उगवतात, ते धान्य कसे उगले आहे यावरून त्या वर्षी पाऊस कसा पडेल याचा अंदाज घेतात. पाऊस कसा पडेल याचा या “गौरी” (उगवलेले धान्य) अंदाज घेतात व आदिवासी लोकं पेरणी करत असतात.