लोकसत्ता वार्ताहर

कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मेंढवन खिंडीजवळही काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.

Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
khair tree costing of rupees 50 lakhs
वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

आणखी वाचा-“मराठा आरक्षणाच्या आदेशाची होळी करू”, ओबीसी नेत्याचा संताप; मुख्यमंत्र्यांना इशारा देत म्हणाले, “सरकार उलथवून…”

काँक्रीटीकरण करताना दोन लेन चे काम सुरू असल्याने केवळ एक लेन वाहतुकीसाठी खुली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी लागत आहे. मेंढवन खिंडीजवळ मुंबई कडून गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहिनी वरती पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सात वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी सुरू झाली असून अद्यापही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे वाहन चालकासह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.