बोईसरच्या बँक ऑफ बडोदा मधील चिल्लरवर चोरटयांनी हात साफ केला आहे. रात्रीच्या सुमारास बँकेच्या खिडकी वाटे आत शिरलेल्या चोरटयांनी दोन लाखाची चिल्लर चोरून नेली आहे. या प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- नववर्षांत ४५ गावांना शुद्ध पाणी; महामार्ग परिसरातील गावांना एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेतून जलजोडणी

बोईसर येथील तारापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या मागील खिडकीचे ग्रील उकडून एक्झॉस्ट फॅन काढून आत शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाख रुपयांची चिल्लर लंपास केली आहे. २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता बँक बंद केल्यावर रात्रीच्या सुमारास खिडकीवाटे बँकेच्या आत मध्ये शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूम समोर ठेवलेल्या २० रुपये नाण्याच्या पाच पिशव्या चोरून नेल्या आहेत. या पिशव्यांमध्ये एकूण दोन लाख रुपयांची चिल्लर होती.

हेही वाचा- कडू कारले शेतकऱ्यांसाठी वरदान; पालघर तालुक्यात १०० एकरवर लागवड, प्रति एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडताच चोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक यांनी बोईसर पोलीस स्टेशन येथे तक्रार देताच अज्ञात चोरट्यांविरोधात गु.रजि.नं.- ५३४/२०२२ ,भा.दं.वि.सं. ४५४,४५७,३९० कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग नित्यानंद झा आणि पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी भेट देऊन पाहणी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर हे अधिक तपास करीत आहेत.