डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवार १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने धडक देत अपघात केला. वाहनाच्या धडकेने महिला महामार्गावर पडली असून तिच्या अंगावरून अनेक वाहने गेल्यामुळे महिलेचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर चारोटी हद्दीत बसवत पाडा समोर मुंबई वाहिनीवर पायी चालत जाणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून महिलेचा मृतदेह चिरडल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेचा मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असून पुढील तपास कासा पोलिस करत आहेत.