-
'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत.
-
या मालिकेत आता गौरीच्या मंगळगौरीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.
-
येत्या आठवड्यात गौरीच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा भाग प्रदर्शित होणार आहे.
-
गौरीच्या मंगळगौरीच्या निमित्ताने संपूर्ण शिर्के पाटील कुटुंब छान पारंपारिक वेशात पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत शालिनी शिर्के पाटील म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर हिने छान नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
हिरव्या रंगाच्या साडीवर त्याला मॅचिंग अशी हेअरस्टाईल आणि दागिनेही तिने घातले आहेत.
-
शालिनीने या वेशातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
गौरीची मंगळागौर, सांगा बरं… आमच्यातल कोण कोण जागवणार, कोण कोण खेळणार मंगळागौर ? असा प्रश्नही तिने विचारला आहे.
-
दरम्यान यापूर्वीच गौरीच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
मंगळगौरीच्या कार्यक्रमाची शिर्के-पाटील कुटुंबाने छान तयारी केल्याचं त्यात दिसत आहे.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक