-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर.
-
सईला नेहमीच तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी चाहत्यांकडून वाहवा मिळाली आहे.
-
उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळते.
-
सईने नुकतंच एक हटके फोटोशूट केले आहे.
-
याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
यावेळी तिने वनपीस परिधान केला त्यासोबत हाय हिल्स घातल्या आहेत.
-
“मला नेहमी सजायला आवडतं,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
अवघ्या दोन तासांपूर्वी सईने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
सईच्या फोटोच्या खाली अनेकांनी सुंदर, मस्त, छान यासारख्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. -
तर काहींनी हार्ट आणि फायर इमोजीचा वापर करुन तिच्या फोटोवर कमेंट केली आहेत.
-
मात्र सईचा हा नवा लूक पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
-
“माकड चावल्यापासून सई असंच करते,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
-
तर एका नेटकऱ्याने “तुला नेमकं काय होतंय, तू अशी वाकडी-तिकडी का होतेस?” अशी कमेंट केली आहे.
-
त्यासोबत एका नेटकऱ्याने “दीदी नक्की काय करायचं तुम्हाला?” असा प्रश्नही तिला विचारला आहे. (सर्व फोटो – सई ताम्हणकर/ इन्स्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम