
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचं अनेकदा तुमच्या कानावर पडलं असेल.

बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींनी मोहक आणि आकर्षक सौंदर्यासाठी सर्जरीचा आधार घेतल्याचं आपल्याला ठाऊक आहे.

कोणी ओठांची शस्त्रक्रिया केली तर कोणी नाकाची प्लास्टिक सर्जरी करवून घेतली.

पण हॅण्डसम दिसण्यासाठी बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनीही शस्त्रक्रियेचा आधार घेतला आहे.

सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करवून घेतलेल्या बॉलिवूडमधील सुपरस्टार्सबद्दल जाणून घेऊया.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अभिनयसोबतच त्याच्या स्टाइलसाठी ओळखला जातो.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने केसगळतीवर उपाय म्हणून हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

केसगळतीमुळे अक्षय कुमारला हेअर विगचा आधार देखील घ्यावा लागला होता.

पन्नाशीतही कलाकारांच्या चेहऱ्यावरील तारुण्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांनादेखील अनेकदा प्रश्न पडतो.

पण वयोमानामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या लपवण्यासाठी काही कलाकारांना प्लास्टिक सर्जरीचा आधार घ्यावा लागला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती आहे.

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने केसगळतीमुळे हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

करिअरच्या सुरुवातीला केसगळतीमुळे पडलेलं टक्कल लपवण्यासाठी हिमेश रेशमिया टोपी घालून परफॉर्म करताना दिसला होता.

कॉमेडियन कपिल शर्मा विनोद आणि अभिनयाने सगळ्यांना खळखळून हसवतो.

कपिल शर्माने देखील हेअर ट्रान्सप्लांट केल्याची माहिती आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखला जातो.

करण जोहरने तरुण दिसण्यासाठी सर्जरीचा आधार घेतला आहे.

नुकताच विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेता रणबीर कपूरने देखील हेअरलाइनसाठी हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली आहे.

याशिवाय डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी त्याने सर्जरीचा आधार घेतल्याची माहिती आहे.

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा सलमान खान पन्नाशीत फिटनेस आणि तरुण दिसण्यासाठी ओळखला जातो.

परंतु केसगळतीमुळे सलमानने देखील हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

याबद्दल एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने स्वतः खुलासा केला होता.

हॅण्डसम दिसणारा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर अनेक मुलींचा क्रश आहे.

शाहिदने तरुण दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतल्याची माहिती आहे.

किंग खान शाहरुख खानने देखील तरुण आणि हॅण्डसम दिसण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट केली आहे.

तसेच शाहरुखने अनेक सर्जरी केल्याचीही माहिती आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)