-
२०२३ हे वर्ष लवकरच संपणार आहे. हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूप खास ठरले आहे. यावर्षी OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित झाल्या, ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आज आम्ही तुम्हाला या वर्षातील IMDb च्या रँकिंगनुसार सर्वात लोकप्रिय ठरलेल्या वेब सिरीज कोणत्या आहेत ते सांगणार आहोत.
-
फर्जी
शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची ‘फर्जी’ ही वेब सिरीज पहिल्या क्रमांकावर आहे. याला IMDb वर ८.४ रेटिंग मिळालं आहे. -
गन्स अँड गुलाब्स
दुसऱ्या क्रमांकावर राजकुमार राव आणि दुलकर सलमान यांची गन्स अँड गुलाब्स आहे. याला IMDb वर ७.७ रेटिंग मिळालं आहे. -
द नाईट मॅनेजर
अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची वेब सीरिज द नाईट मॅनेजर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. IMDb वर त्याला ७.६ रेटिंग आहे. -
कोहरा
चौथ्या नंबरला सुविंदर विक्की आणि बरुण सोबती यांनी ‘कोहरा’ वेब सिरीज असून IMDb वर त्याला ७.५ रेटिंग मिळाले आहे. -
असुर २
या यादीत अर्शद वारसीची वेब सिरीज ‘असुर 2’ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला IMDb वर ८.५ रेटिंग मिळाले आहे. -
राणा नायडू
व्यंकटेश दग्गुबती आणि राणा दग्गुबती यांच्या ‘राणा नायडू’ ला IMDb वर ७.१ रेटिंग मिळाले आहे. -
दहाड
तव्या क्रमांकावर सोनाक्षी सिन्हाच्या ‘दहाड’चे नाव आहे. दहाडला IMDb वर ७.६ रेटिंग मिळाले आहे.

२७ वर्षानंतर न्यायदेवता शनी बदलणार आपली चाल,’या’ राशींचे नशीब सोनासारखे चमकणार! प्रगतीसह होईल खूप कमाई