-
बजाज पल्सरला भारतीय बाजारपेठेत १८ वर्ष पूर्ण झाली. २००१ मध्ये बजाजनं मस्क्युलर अशी पल्सर ही गाडी लाँच केली होती. गेल्या १८ वर्षांमध्ये बजाजनं पल्सरची अनेक मॉडेल्स बाजारात आणली. या कालावधीत त्यामध्ये बदलही करण्यात आले. या वर्षांमध्ये पल्सरनं ब्रँडनं १.२५ कोटी खरेदीदारांना आपल्यासोबत जोडलं. देशातच नाही तर परदेशातही या गाडीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तर आपण नजर टाकूया पल्सरच्या आतापर्यंतच्या प्रवासावर. ( सर्व फोटो – बजाज पल्सर, वेबसाईट)
-
Pulsar 150, Pulsar 180 Classic – 2001 – पहिल्यांदा लाँच केलेल्या पल्सर बाईकमध्ये पारंपारिक गोल हेडलॅम्प होता. बाईकमध्ये 150/180 सीसी, 2 वॉल्व्ह, एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर, 4 स्ट्रोक युनिट इंजिन होते. हे 12/15 एचपी पॉवर जनरेट करते.
-
Bajaj Pulsar अपग्रेड-1 – 2003 – पल्सरमध्ये पहिले अपग्रेडमध्ये तिच्या हेडलम्पममध्ये बदल करण्यात आले. तसंच ते पायलट हेडलम्प म्हणून ओळखले जाऊ लागले. या पल्सर मॉडेलमध्ये बजाजचे डीटीएस-आय डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन टेक्नॉलॉजी प्रथमच सादर केली गेली. या मदतीने गाडीचं पॉवर आऊटपूट वाढलं.
-
Bajaj Pulsar अपग्रेड-2 – 2004 – 2004 मध्ये बजाज पल्सरमध्ये अलॉय व्हिल्स देण्यात आली. तसंच उत्तम कम्फर्टसाठी रिअरमध्ये ट्विन नायट्रॉक्स शॉकअॅब्झॉर्ब्स देण्यात आले. याव्यतिरिक्त पल्सर 180 ऑल ब्लॅक थीममध्येही आली.
-
Bajaj Pulsar अपग्रेड-3 – 2006 – 2006 मध्ये सर्वात मोठे अपडेट पल्सरमध्ये करण्यात आले. यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि इंजिन कील स्वीच देण्यात आला होता. तसंच अंधारातही गैरसोय होऊ नये यासाठी बँकलाईट स्विच अॅड करण्यात आले होते. याव्यतिरिक्त सेल्फ कॅन्सलिंग आणि फ्लेक्सिबल टर्न इंडिकेटर्सही देण्यात आले होते. वुल्फ आईड ट्विन पायलट लॅम्प आणि आरपीएम शिफ्ट लाईटलाही यात अॅड करण्यात आलं होतं.
-
Bajaj Pulsar 200 DTS-i, Pulsar 220 DTS-Fi – 2007 – 2007 मध्ये कूल्ड इंजिन आणि अधिक मस्क्युलर स्टायलिंगसोबत पल्सर 200 लाँच करण्यात आली. त्यासोबतच फ्युअल इंजेक्शन सिस्टिमसोबत पल्सर 220 देखील लाँच करण्यात आली. पल्सर 220 मध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले होते.
-
Bajaj Pulsar अपग्रेड-4 – 2009 – 2009 मध्ये 180 सीसी पल्सरला 200 सीसी प्रमाणे तयार करण्यात आलं होतं. यात स्प्लिट सीट. 120 एमएम टायर आणि क्लिप ऑन हँडलबार्स देण्यात आले होते. तसंच किक स्टार्टचा पर्यायही काढून टाकण्यात आला होता.
-
Bajaj Pulsar 135 LS – 2009 – 2009 मध्ये कमी इंजिन क्षमतेच्या पल्सरचं मॉडेल लाँच करण्यात आलं होतं. ही देशातील पहिली बाईक होती ज्यामध्ये 4 व्हॉल्व्ह DTS-i टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. पल्सर 135 ब्लॅक अलॉय व्हिल्स आणि फ्रन्ड डिस्क ब्रेकसह लाँच करण्यात आली होती.
-
Bajaj Pulsar 200 NS – 2012 – 2012 मध्ये नव्या शार्पर डिझाइनमधील पल्सर 200 NS लाँच करण्यात आली. यामध्ये ट्विन पोझिशनिंग लॅम्प हेडलॅम्पच्या खाली देण्यात आले होते. तसंच यात लिक्विड कूल्ड, DTS-i, ट्रिपल स्पार्क इंजिन देण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त गॅस चार्ज्ड मोनोशॉकही देण्यात आले होते.
-
Bajaj Pulsar RS200 – 2015 – मार्च 2015 मध्ये पल्सर RS200 लाँच करण्यात आली. यामध्ये डेटाटाईम रनिंग लाईट्स, नवा डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि ऑप्शनल एबीएस देण्यात आले होतं. पल्सर RS200 च्या इंजिनचे पॉवर आऊटपूट 24hp आणि ट्रान्समिशन 6 स्पीड होतं.
-
Bajaj Pulsar AS200, Pulsar AS150 – 2015 – एक महिन्यानंतर एप्रिल 2015 मध्ये बजाज पल्सर एएस AS200 आणि पल्सर AS150 एलाँच केली गेली. या मॉडेलमध्ये लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शन, लार्ज विंडस्क्रीन देण्यात आली होती.
-
Bajaj Pulsar NS160 – 2017 – पल्सरच्या या व्हेरिअंटमध्ये 160cc, ऑईल कूल्ड इंजिन DTS-i टेक्नॉलॉजीसोबत देण्यात आलं होतं. हे इंजिन 15hp पीक पॉवर जनरेट करतं.
-
Bajaj Pulsar 125 Neon – 2019 – ही सर्वात छोटी पल्सर आहे. ही पल्सर 150 च्या स्टायलिंगप्रमाणेच लाँच करण्यात आली. तसंच व्हिज्युअल अपिलसाठी नियॉन कलर लाईट्सचाही वापर करण्यात आला होता. यात ऑप्शनल फ्रन्ट डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत.

Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा