-
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा नक्षत्र व राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येऊ शकतो.
-
काही मंडळींसाठी हे ग्रह गोचर अत्यंत शुभ ठरू शकते तर काहींना मात्र या काळात अपार कष्ट सहन करावे लागू शकतात.
-
येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी बुध देव मकर राशीत प्रवेश घेणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मकर ही शनिची रास म्हणून ओळखली जाते.
-
बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे भद्रा राजयोग तयार होत आहे, जो अनेक राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
-
भद्रा राजयोग अत्यंत फलदायी मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांना धनप्राप्ती होऊ शकते.
-
येत्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच भद्राराजयोग घडल्याने काही राशींचे भाग्य उजळळ्याची शक्यता निर्माण होत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी.
-
या राशीच्या लोकांसाठी भद्रा राजयोग खूप फलदायी ठरू शकतो. बुध ग्रह राशि परिवर्तन करताच वृषभ राशीच्या मंडळींसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. बुध ग्रहाचे गोचर हे आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत नवव्या स्थानी होत आहे. तुम्हाला येत्या काळात निष्ठेतून धनलाभ होण्याची संधी आहे. नशिबाची जोरदार साथ लाभू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना येत्या काळात प्रगतीचे योग असू शकतात.
-
भद्रा राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते आणि अडकलेला पैसाही या काळात मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांती नांदेल आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
-
धनु राशीसाठी बुध ग्रह गोचर हे शुभ व फलदायी सिद्ध होऊ शकते. स्थानिकांची दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकतो. स्थानिकांनाही गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
भद्रा राजयोग बनणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या लग्न घरामध्ये हा योग तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. यासोबतच तुमच्या जीवनातील सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते. यावेळी तुम्हाला पैसे वाचवण्यात आणि पैसे गुंतवण्यात यश मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
७ फेब्रुवारीला ‘भद्रा राजयोग’ घडल्याने ‘या’ राशी होऊ शकतात मालामाल, बुधदेवाच्या कृपेने वर्षभर येणार पैसाच पैसा?
Budh Dev Transit In Makar: बुध ग्रह ७ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्रा राजयोग तयार होत आहे. भद्रा राजयोग बनणे काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
Web Title: Budh grah transit and will make bhadra rajyog 7 february in 2023 people of this zodiac sign will get a lot of money pdb