-
हॉटेल, रेस्टोरंट किंवा अगदी ढाब्यात गेलो तर सुरवातीला आपण सगळेच स्टार्टर खायला मागतवतो. यामध्ये टाईपमास, क्रिस्पी, लॉलीपॉप, सूप तर काहीवेळा ‘चना कोळीवाडा’ सुद्धा मागवला जातो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर चवीला चटपटीत असा हा ‘चना कोळीवाडा’ बनवायला खूपचं सोपा आहे. तर आज आपण याच पदार्थाची अगदी काही मिनिटांत होणारी रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेच लिहून घ्या साहित्य व कृती… (फोटो सौजन्य : @Freepik / इन्स्टाग्राम / @pawar_omkar)
-
काबुली चणे, मोहरीचे तेल, हळद, धणे पावडर, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, आलं-लसूण पेस्ट, पाणी, मीठ, कॉर्न फ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ, बेसन, लसूण आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
काबुली चणे स्वछ धुवून रात्रभर पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सकाळी उठल्यानंतर कुकरमध्ये काबुली चणे ठेवा, त्यात मीठ, पाणी घाला आणि दोन शिट्या द्या.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यानंतर काबुली चणे पाण्यातून गाळून घ्या. नंतर एका भांड्यात मोहरीचे तेल, हळद, धणे पावडर, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, मीठ, पाणी आणि आलं-लसूण पेस्ट घालून पेस्ट बनवून घ्या. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / @pawar_omkar)
-
त्यानंतर या मिश्रणात काबुली चणे मिक्स करून घ्या. नंतर त्यात कॉर्न फ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ, बेसन सुद्धा घाला.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.त्यानंतर तेलात लसूण व काबुली चणे कुरकुरीत तळून घ्या. अशाप्रकारे तुमचा ‘चना कोळीवाडा’तयार.(फोटो सौजन्य : @Freepik)इन्स्टाग्राम / @Freepik / @pawar_omkar)
-
अशाप्रकारे तुमचा ‘चना कोळीवाडा’ (Chana Koliwada) तयार.(फोटो सौजन्य : @Freepik)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक