-
राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला.
-
या निकालात महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
-
नाट्यमय घडामोडींनंतर राज्यसेभच्या सहाव्या जागेवर निवडूण आलेले भाजपाचे धनंजय महाडिक चर्चेत आले आहेत.
-
नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल जाणून घेऊया.
-
धनंजय महाडिक हे भाजपाचे कोल्हापुरातील अनुभवी राजकारणी आहेत.
-
साखर आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातही त्यांचं नाव आहे.
-
मुन्ना महाडिक या नावानेदेखील ते ओळखले जातात.
-
२००४ मध्ये शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
-
परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदाशिव मंडलिक विजयी झाल्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला होता.
-
त्यानंतर धनंजय महाडिक यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
-
२००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
-
परंतु, या निवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागला.
-
२०१४-२०१९ दरम्यान ते लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार होते.
-
परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवारापुढे ते पराभूत झाले.
-
सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून साथीदारांसह भाजपात प्रवेश केला.
-
आता धनंजय महाडिक भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडूण आले आहेत.
-
धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत.
-
(सर्व फोटो : धनंजय महाडिक/ इन्स्टाग्राम)

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल