नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं आपली छाप सोडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे पाच आमदार निवडून आले आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी झाला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. लंडनमधून असदुद्दीन ओवेसी यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांना जवळचे लोक असद भाई नावाने ओळखतात. असदुद्दीन ओवेसी यांच्या पत्नी फरहीन ओवेसी गृहिणी आहेत. त्या घरीच राहून कुटुंबाची काळजी घेतात. असदुद्दीन ओवेसी यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. असदुद्दीन ओवेसी यांना दोन भाऊ आहेत. लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी सध्या राजकारणात सक्रीय आहेत. सर्वात लहान भाऊ बुरहानुद्दीन ओवेसी “इत्तेमाद” या वृत्तपत्राचे संपादक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ओवेसी यांच्याकडे १३ कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती तर एक कोटी ६७ लाख रुपयांची जंगम संपत्ती आहे. यावेळी त्यांनी ९ कोटी ३० लाख रुपयांचं कर्ज असल्याचेही सांगितलं होतं. असदुद्दीन ओवेसी आपल्या थेट राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात.

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश