गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. दरम्यान, या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने लक्ष घातले असून आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत एमआयएम पक्षानेदेखील उडी घेतली आहे. येथे एमआयएम एकूण ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
chandrapur lok sabha marathi news, sudhir mungantiwar marathi news
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवण्याचे भाजप-काँग्रेससमोर आव्हान
Kolhapur, Kolhapur Lok Sabha,
प्रचार लोकसभेचा पण मशागत विधानसभेची

एमआयएम पक्ष गुजरातमधील एकूण १८२ जागांपैकी ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पक्षातील नेत्यांनी पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून दलित आणि मुस्लीम आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यातील तीन जागा या अहमदाबाद तर दोन जागा या सुरतमधील आहेत. या पाच जागांपैकी चार जागांवरील उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >> अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब

फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने चांगली कामगिरी केली होती. पक्षाने येथे लढवलेल्या ४० जागांपैकी २६ जागांवर विजय मिळवला होता. एमआयएमचे मोडासामध्ये नऊ, गोध्रामध्ये सहा, भरूचमध्ये एक तर अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत सात उमेदवार विजयी झाले होते.

हेही वाचा >> दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आमदी पक्षासोबतच एमआयएमने उडी घेतल्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे काँग्रेसकडून एमआयएमवर टीका केली जात आहे. एमआयएमकडून विरोधकांना मिळणारी मते फोडण्याचे काम केले जात आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. ज्या मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. अगदी त्याच ठिकाणी एमआयएम आपले उमेदवार उभे करू पाहात आहे, अशी टीका काँग्रेसकडून केली जात आहे.