सांगली : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगलीचा गड काबिज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हालचाली सुरू केल्या असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची सूत्रे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे तर महापालिका क्षेत्रातील सुत्रे प्रा. पद्याकर जगदाळे यांच्या हाती सोपवली आहेत. या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात आपल्या गटाची बांधणी करण्याचे मनसुबे दिसत असले तरी अप्रत्यक्ष आमदार पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न दिसत आहे.

नवीन ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत असताना पक्ष विस्ताराला सध्या तरी फारसा वाव दिसत नाही. जिल्ह्यात सर्वात अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करण्यासाठी पुढाकार घेणारे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष पद देत असताना त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली असली तरी त्याचाही राज्य पातळीवर गट विस्ताराला फारसा उपयोग होईलच याची सध्या तरी खात्री देता येत नाही.

Milind narvekar to join bjp?
पुढील लक्ष्य मिलिंद नार्वेकर! ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून खास रणनीती?
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका

हेही वाचा : तेलंगणा जिंकण्यासाठी काँग्रेसची डाव्यांशी हातमिळवणी, बीआरएसला फटका बसणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आणि पक्षावर हक्क कोणाचा याची लढाई न्यायालयीन स्तरावर सुरू आहे. याचा निकाल काय यायचा तो यथावकाश येईलच, पण आजही राष्ट्रवादीतील फुटीबाबत सामान्य कार्यकर्त्यांमध्ये साशंकता आहे. जिल्ह्याचे नेते आमदार पाटील यांनी आजही आपल्या पक्षापेक्षा गटाची बांधणी एकसंघ राहील याची काळजी घेतली असली तरी त्यांच्याबाबतही बर्‍याचवेळा साशंकता व्यक्त करण्यात येते. अधूनमधून त्यांच्या भाजप अथवा अजित पवार यांच्या गटात सहभागी होत असल्याच्या बातम्या माध्यमातून येत असतात. प्रत्येकवेळी त्यांनी खुलासा करून आपली निष्ठा जेष्ठ पवारांच्याशी असल्याचा केला आहे. मात्र, खुद्द भाजप गोटातून त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा घडवून आणली जाते. अजित पवार यांच्यापेक्षा आमदार पाटील यांच्या भाजपशी घरोबा करण्यास प्राधान्य होते. त्यांना केवळ 14 आमदार घेउन बाहेर पडण्याचा सा देण्यात आला होता. मात्र, मानसिक तयारी त्यांनी केली नाही. मगच अजित पवार यांना गळ घालण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता थोरल्या पवार साहेबांना सोडून तिसर्‍या, चौथ्या पंगतीत बसण्याची तयारी आमदार पाटली यांची तयारी नाही. त्यापेक्षा आहे त्याच ठिकाणी जर विधानसभा निवडणुकीत चांगले स्थान मिळाले तर एक नंबरची सत्ता मिळण्यासाठी फारशी यातायात करावी लागणार नाही हे गणित घेउनच त्यांची राजकीय वाटचाल सध्या सुरू असल्याचे दिसते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी मथुरेतून राजस्थान विधानसभेचा प्रचार केला? यूपीमधील मथुरा आणि राजस्थानचा काय संबंध?

मात्र, आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी अजित पवार गटात जाण्यास फारशी अनुकूलता दर्शवली नाही. माजी महापौर नायकवडी यांनी आमदार पाटील यांचा महापालिका राजकारणात होत असलेला हस्तक्षेप पाहूनच सवता सुभा मांडत विकास आघाडीच्या काळात महापालिकेचे राजकारण घडवले. तेव्हापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीत असूनही नसल्यासारखे असले तरी भाजपकडून सत्ता हस्तगत करीत असताना केवळ माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांना संधी दिली जाणार नाही या एका अटीवर राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना महापौर पदी विराजमान होण्यास मदत केली होती. आता अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्यांच्याकडे महापालिका क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात येईल असे वाटत असताना प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी दिली गेली. मात्र, त्यांचा शहरी राजकारणाचा तोंडवळा मर्यादित असल्याने याचा गट विस्ताराला कितपत फायदा होईल याबाबत साशंकता वाटणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा : राजकीय रणनीतीकारांचा निवडणूक प्रक्रियेत प्रवेश; राजस्थान, तेलंगणामध्ये प्रचार कसा केला जातो?

विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे ग्रामीणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुळात त्यांचे लक्ष हे केवळ आमदारकीकडे आहे. खानापूर-आटपाडी मतदार संघाचे सध्या प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनिल बाबर यांच्याकडे आहे. यामुळे महायुतीत या जागेवर प्राधान्याने बाबर यांच्या नावाचा विचार होणार हे स्पष्ट आहे. मग पाटील यांच्या मनसुब्याचे काय होणार ? हा प्रश्‍न उरणारच. आज पर्यंत विटा शहरातील पाटील घराण्याचे राजकारण शहराबाहेर ग्रामीण भागात विस्तारलेले नाही. आमदार बाबर यांचे ग्रामीण भागात आजही प्राबल्य आहे. टेंभू योजनेसाठी पाठपुरावा करून त्यांनीही आपले राजकीय अस्तित्व राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. मात्र, पाणीदार आमदार या शब्दालाच आव्हान देत त्यांना पाटलांनी शह देण्याचा प्रयत्न चालविला होता. यासाठी कधी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचीही मदत ते घेत असतात, तर कधी अपक्षाचा नारा घेउन मैदानात उतरतात. आता अजित पवार गटाचा जिल्हा पातळीवर विस्तार करताना त्यांना अधिक व्यापक भूमिका घ्यायला लागणार आहे. कधी होतील तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व अथवा उपद्रवमूल्य हे दाखवावेच लागेल. जिल्हा स्तरावर निवड होउनही अद्याप त्यांनी आपली भूमिका, पक्षविस्तारासाठी एखादा कार्यक्रम सांगितला नाही. हीच स्थिती प्रा. जगदाळे यांचीही म्हणता येईल. मूळच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याकडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद होते. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसकडे असल्याने मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला कितपत मदत झाली हे झाकली मूठ सव्वा लाखाची याच पठडीत राहिली आहे. यामुळे नव्या पदाधिकार्‍यांना संधी देत असताना आणखी कोणी मातब्बर हाती लागतो का याचीच प्रतिक्षा अजित पवार गटाला करावी लागणार आहे.