धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून तिकिट मिळालं तर आश्चर्य वाटणार नाही अशी खोचक प्रतिक्रिया AIMIM चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ANI शी बोलताना दिली आहे.

काय आहे नुपूर शर्मांचं प्रकरण?

नुपूर शर्मा यांनी जून २०२२ मध्ये एका चॅनलवर डिबेट शो सुरू असताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून नुपूर शर्मांवर टीकेची झोड उठली होती. भाजपाने त्यांना प्रवक्ते पदावरून हटवलं होतं. एवढंच नाही तर नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याचा निषेध देशभरातून करण्यात आला होता. तसंच देशात काही हिंसक घटनाही घडल्या होत्या.

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्यांच्या हत्या

राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला. तसंच महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्येही उमेश कोल्हे यांची हत्या गळा चिरून करण्यात आली होती.

हिंसाचाराच्या घटनांबाबत काय म्हणाले ओवेसी?

नुपूर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्यांच्या ज्या हत्या करण्यात आल्या त्यांचा मी निषेध करतो आहे असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे. मी स्वतःही सर तन से जुदा सारख्या नाऱ्यांना विरोध करणारा माणूस आहे. एवढंच नाही तर पुढे ओवेसी असं म्हणाले की नुपूर शर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळ लावला होता? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर बराच राडा झाला होता. या सगळ्यानंतर नुपूर शर्मा यांनी हे वक्तव्यही मागे घेतलं होतं. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या हे नुपूर शर्मा यांनी या सगळ्या वादानंतर म्हटलं होतं. आता ओवेसी यांनी भाजपावर टीका करताना नुपूर शर्मा यांचं नाव घेत उद्या त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हटलं आहे.