राज्यात उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी गटांना राजकीय अजेंडा राबवू देणे आणि सरकारच्या बाजूने जातीय सलोख्याचे जतन करणे अशा द्विधा स्थितीत कर्नाटकचे भाजपा सरकार दिसते आहे. कर्नाटक वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली असलेल्या २.५ एकर जागेवरील बेंगळुरूतील इदगाह मैदान सतत वादाचे कारण बनते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे यंदा स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वज चामराजपेट येथील ईदगाह मैदानात फडकविण्यावरून श्री राम सेना, बजरंग दल आणि इतर पक्षांनी दिलेली धमकी किंवा भाजपा सरकारच्या नियंत्रणाखालील बृहत बेंगळुरू महानगर पालिकेने स्वत:ला ६ ऑगस्ट २०२२ रोजी या जागेचे मालक म्हणून स्वत:च्या नावाची केलेली घोषणा असो हे मैदान कायमच वादात असते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाच्या पुढाकाराने आणि हिंदू-मुसलमान गटांच्या उपस्थितीत मैदानावर पहिल्यांदा ध्वजवंदन संपन्न झाले होते.

मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर हे मैदान पुन्हा वादाचे कारण बनले. याठिकाणी गणेशोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी लहान हिंदुत्ववादी गट बीबीएमपीने केली. या त्यांच्या मागणीला  वक्फ बोर्डाने आव्हान दिले.जुलै महिन्यात याच मैदानावर बकरी ईदचे शांततापूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. कॉँग्रेसचे बी झेड झमीर अहमद हे इथले स्थानिक आमदार आहेत. सण कोणताही असो, हे मैदान कायम वादात असल्याचे चित्र आहे. या सगळ्या प्रकारवर बोलताना भाजपामधील सूत्रांनी सांगितले, “कॉँग्रेस आणि एस एम कृष्णा तसेच सिद्धरामय्या यांना निवडणुकीच्या दृष्टीने हा मुद्दा ‘सेफ हेवन’ वाटतो. चामराजपेट ईदगाह मैदानाचा मुद्दा अलीकडच्या काळात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत आरएसएसच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेतही समोर आला. पक्षाला इदगाह मैदानाचा मुद्दा जिवंत ठेवण्यात रस वाटतो, अशी माहिती भाजपा सूत्रांकडून समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru eidgah maidan issue will dominate till the 2023 elections pkd
First published on: 31-08-2022 at 17:29 IST