लक्ष्मण राऊत

जालना : जालना जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस असलेल्या पट्ट्यात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे अलिकडेच या पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या मेळाव्यात सूचित झाले. जिल्ह्यात भाजपचे तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक विधानसभा सदस्य आहे. राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य असलेल्या राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील सर्वाधिक उसाच्या पट्ट्यात येतो. मागील तीन-चार वर्षांत चांगला पाऊस झाल्याने या भागातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. तीन साखर कारखाने असूनही या भागातील ऊस अतिरिक्त ठरत असून गाळपासाठी जिल्ह्याबाहेर पाठवावा लागत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील उसक्षेत्राचा मोठा भाग जायकवाडी लाभक्षेत्रात येतो. राजेश टोपे यांच्या अधिपत्याखालील दोन सहकारी साखर कारखाने आणि अन्य एका खासगी साखर कारखान्यात मिळून एकूण जवळपास २० लाख टन उसाचे गाळप चालू हंगामात अपेक्षित आहे. तरीही या भागातील मोठ्या प्रमाणावर ऊस अतिरिक्त ठरणार आहे.

हेही वाचा… भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

राष्ट्रवादीचे राजेश टोपे या भागातून सलग पाच वेळेस निवडून आलेले आहेत. मागील निवडणुकीत टोपे विजयी झाले खरे, परंतु निवडून येताना मात्र त्यांची शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उडाण यांच्यासमोर चांगलीच दमछाक झाली. परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार लोणीकर घनसावंगी भागात पूर्वीपासून संपर्क ठेवून आहे. घनसावंगी विधानसभा क्षेत्र जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट नाही. घनसावंगी आणि परतूर मतदारसंघाच्या क्षेत्रात येतात.

हेही वाचा… कोकणात ’तुल्यबळ‘ उमेदवारांमध्ये लढत

भाजपचे ज्षेठ नेते व जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अलिकडेच पक्षातील नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आवर्जून घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील सरपंचांचा सत्कार अधोरेखित करण्यात आला. घनसावंगीशिवाय अंबड तालुक्याचा काही भाग या मतदारसंघात येतो.

हेही वाचा… नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

माजी आमदार विलास खरात, खासगी समृद्धी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाडगे आणि सध्या भाजपमध्ये असलेले जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष डोंगरे यांची सरपंचांच्या मेळाव्यातील उपस्थिती ठळक असून दिसणारी होती. एकेकाळी अन्य पक्षांत असणारे हे तिन्हीही नेते जिल्ह्याच्या राजकारणात दानवे यांच्यासोबत असल्याचे यावेळी एकप्रको स्पष्टच झाले. यापैकी खरात आणि घाडगे घनसावंगी तालुक्यातील उसाच्या पट्ट्यातील आहेत. कार्यक्रमात काही सरपंच जागेवरून उठू लागले त्यावेळी दानवे यांनी त्यांना बसावयास सांगितले. राजकारणातील अनुभवी खरात आणि डोंगरे यांच्याकडून चार गोष्टी एकून घ्या, असा सल्लाही दिला. अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले खासगी साखर कारखानदार घाडगे यांचाही जाणीवपूर्वक उल्लेख दानवे यांनी भाषणात केला. व्यासपीठाच्या पाठीमागील बॅनरवर खरात यांच्याशिवाय घाडगे यांचा फोटोही ठळकपणे होता. उसाच्या पट्ट्यातील घनसावंगी तालुक्याकडे दानवे यांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे या कार्यक्रमातून सूचित झाले.

Story img Loader