संजीव कुलकर्णी

नांदेड : काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान जिल्ह्यात राबविले जात असून या अभियानाचा शुभारंभ येत्या प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.

Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
sangli lok sabha marathi news, sangli bjp lok sabha marathi news
सांगलीत विरोधकांमधील फूट भाजपच्या पथ्थ्यावरच
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून रणनिती आखली जात असून प्रदेश पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची निवड करण्यात आली असून नांदेडची जबाबदारी अभिजीत सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक व्यापक बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर , माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा… कोकणात ’तुल्यबळ‘ उमेदवारांमध्ये लढत

हेही वाचा… नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती फायदेशीर ठरावी यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविले जात आहे. आपण जे बोलतो ते करतो. त्यामुळे आपल्याला यश मिळत आहे. पुढील दोन वर्षे निवडणुकांचे असून या निवडणुकांमध्येदेखील काँग्रेसला निश्चितपणे भरीव यश मिळेल, असा विश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.