आकरा वर्षापूर्वी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर यांची विधिमंडळात जाण्याची संधी हुकली होती. तेव्हा उमेदवारीची माळ शेवटच्या क्षणी अतुल सावे यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून सातत्याने राजकीय पटलावर वावरणारे संजय केनेकर यांचे नाव भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार म्हणून जाहीर रविवारी जाहीर केले.

सातत्याने वेगवेगळी आंदोलने करणारा भाजपचा कार्यकर्ता अशी केनेकर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओळख आहे. त्यांनी महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणूनही काम केले आहे. नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारे संजय केनेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेहमी पाठराखण केली. त्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणारा कार्यकर्ता अशी ओळख ते निर्माण करत राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते काम करत होते. भारतीय जनता युवा मोर्चा १२ वर्षे काम करणाऱ्या संजय केनेकर यांनी बड्या नेत्यांबरोबर काम केले. मंत्री म्हणून काम करताना स्मृती इराणी या संजय केनेकर यांच्या कामाचे कौतुक करत. भारतीय जनता युवा मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. महापालिकेत गटनेता असणारे संजय केनेकर हे अलिकडे मराठवाड्यात विविध जिल्ह्यात प्रचार करत होते. त्याच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आल्याने ओबीसी घटकातील कार्यकर्त्यास न्याय दिल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपमधील ओबीसी नेत्यांचे समर्थन करणाऱ्या संजय केनेकर हे आक्रमक वक्तव्य करण्यासाठीही ओळखले जातात. सामुहिक आरत्यांचे आयोजनातही त्यांचा सहभाग असे.चांगला परिचय त्यांच्या दिल्लीमध्येही या पूर्वीही त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमदेवार म्हणून उभे करण्याची चर्चा झाली होती. तेव्हा प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या होत्या.