छत्रपती संभाजीनगर : नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांत काँग्रेसचे बलवान नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख या दोघांची लोकसभा मतदारसंघात दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. नांदेड आणि लातूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपला यश मिळाले होते. आता त्यांना मिळणारे यश रोखण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत अलिकडेच बैठका आणि मेळावे झाले. मात्र, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही विशेष कार्यक्रम न ठरल्यामुळे मनोबल उंचवावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली व जालना या चार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढवते. यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघावर शरद पवार यांचे समर्थक जयप्रकाश दांडेगावकर यांनीही दावा सांगितला आहे. जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून कोणाला उभे करायचे, याचा निर्णय उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नाही. सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच असतो. शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजीनगरमधील कोणालातरी उमेदवारी दिली जाते. विलास औताडे आणि डॉ. कल्याण काळे यांनी ही जबाबदारी उचलली होती. डॉ. काळे यांनी एका निवडणुकीत कडवी झुंजही दिली. मात्र, या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. लातूरच्या आरक्षित मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवार नसतो. मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख असताना कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी त्यांना निवडूनही आणले. पुढे उमेदवार निवडून आणणे अमित देशमुख यांना जमले नाही. लोकसभा मतदारसंघात त्यांची दमछाक होते, असेच गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील चित्र आहे. ट्वेंटी वन शुगर आणि मांजरा परिवाराच्यावतीने ते करत असणारी साखरपेरणी लोकसभा निवडणुकीत उपयोगी होत नाही, असे दिसून आले आहे.

Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
Amol Kolhes wealth doubled in five years
अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत झाली दुप्पट
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा
akola bjp senior leader narayanrao gavhankar
अकोल्यात भाजपमध्ये बंडखोरी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांचा अर्ज दाखल

हेही वाचा : राजू शेट्टी – रविकांत तुपकर मतभेद शिगेला; स्वाभिमानीत आणखी एका फुटीची बीजे

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा मागून घेण्यात आली. सातव २०१४ मध्ये मोदी लाटेतही निवडून आले. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हिंगोली मतदारसंघातील काँग्रेसचा प्रभाव हळुहळु ओसरू लागला. आता या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

हेही वाचा : वंचितमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलणार ? भाजपपुढे आव्हान

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपात सारे काही आलबेल नाही. मात्र, असे असले तरी निवडणूक सहजपणे जिंकता येईल का, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे कार्यकर्तेही नकारात्मकच देतात. काँग्रेसच्या नेत्यांची दमछाक रोखण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा पक्षातील नेत्यांकडून स्थानिक पातळीवर झिरपावी, असे अपेक्षित होते. मात्र, रमेश चेन्निथला यांच्या लातूरच्या बैठकीनंतर आणि नांदेडच्या मेळाव्यानंतर उत्साह वाढविणारे उपक्रम काँग्रेस कार्यकर्त्यांना नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नेत्यांची दमछाक रोखता येईल असा राज्यस्तरीय कार्यक्रम नसल्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे.

हेही वाचा : फुटीनंतरही उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिलेल्या परभणीत भगवा पुन्हा फडकणार ? 

२०१९ च्या नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना चार लाख ४६ हजार मते मिळाली होती. यश मिळविणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकर यांना त्यांच्यापेक्षा ४० हजार मते अधिक पडली होती. लातूरमधून काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ एवढी मते मिळाली होती. ती विजयापर्यंत पोहचू शकली नाहीत. हिंगोलीमध्ये काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना अचानक संधी देण्यात आली. पण त्यांना यश मिळाले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ लोकसभेच्या जागामध्ये एकही जागा काँग्रेसला मिळवता आलेली नव्हती.