कर्नाटक विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत भाजपाची थेट काँग्रेसशी लढत होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा दौराही केला आहे. अशातच कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. भाजपाने विधानसभा अपवित्र केली आहे, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे.

“भाजपा सरकारचे फक्त ४० ते ५० दिवस राहिले आहेत. तुमचा तंबू बांधण्याची वेळ आली आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही विधानसभा डेटॉलने साफ करु. तसेच, आमच्याजवळ शुद्धिकरण करण्यासाठी गोमूत्र सुद्धा आहे. हे दृष्ट सरकार गेलं पाहिजे, हीच लोकांची इच्छा आहे. बोम्मईंनी आपल्या मंत्र्यांना पॅकअप करण्यासाठी सांगितलं पाहिजे,” असा टोलाही डीके शिवकुमार यांनी लगावला आहे.

हेही वाचा : सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

काँग्रेस सरकारच्या काळातील ‘टेंडरश्योर’ या प्रकल्पात अनियमितता झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याप्रकरणी भाजपाने तक्रारही दाखल केली आहे. कॅग अहवालाचा हवाला देत आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल केला. ३५ हजार कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचं सुधाकर यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : बीबीसीच्या माहितीपटावरून राजकारण तापलं! बंदीनंतरही सीपीआय, काँग्रेसकडून स्क्रिनिंग; केरळमध्ये हिंसाचाराच्या घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आरोपांना डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपा मागील साडेतीन वर्षापासून सत्तेत आहे. त्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यायला हवे होते. भाजपाजवळ ४० टक्के कमिशनचं ‘ब्रँड’ आहे. तो त्यांना लपवायचा आहे. म्हणूनच ते सातत्याने काँग्रेसवर खोटे आरोप करत आहेत,” असं डीके शिवकुमार यांनी म्हटलं.