काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या बुधवारी एक खळबळजनक दावा केला. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मतमतांतर पाहायला मिळत आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांसाठीही हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सुशील कुमार शिंदे आपल्या दाव्यात म्हणाले की, भाजपाने त्यांना दोनदा आपल्या पक्षात सामील होण्यासाठी संपर्क साधला होता. भाजपाला राज्यात विस्तार करायचा असून यात सत्ताधारी पक्षाचा समावेश करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे. विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला संपवण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

भाजपामध्ये सामील व्हायचे असेल तर आम्ही स्वागतच करू

भाजपाने शिंदे यांना दिलेली ऑफर अधिकृतपणे प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाकारली आहे. बावनकुळे यावर म्हणाले, “भाजपाने कोणालाही औपचारिक ऑफर दिलेली नाही. सुशील कुमार शिंदे यांना कोणीही ऑफर दिलेली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि विकासाचा अजेंडा स्वीकारून कोणाला भाजपामध्ये सामील व्हायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.”

वैयक्तिक विरोधी नेत्यांपर्यंत पोहोचणे किंवा त्यांच्यात आणि पक्षात फूट पाडणे, हे भारतीय जनता पक्षाचे धोरण सगळ्यांना स्पष्ट दिसत आहे.

राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे हे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यपालदेखील राहिले आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेते असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच भाजपाला झाला असता. मात्र, शिंदे यांनी सध्या काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहणे पसंत केले आहे. ते म्हणाले, “भाजपामध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

शिंदे यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीपूर्वी एका आरएसएस /भाजपाच्या विचारवंताने मी त्यांच्यात सामील व्हावे, असे निवेदन केले होते. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे मी त्यावेळी लगेचच त्यांची ऑफर नाकारली होती.”

आता शिंदे आणि बावनकुळे यांनी केलेल्या विधानांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. २०२४ मध्ये सोलापूरसाठी योग्य उमेदवार शोधण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.

भाजपामधील सूत्रांनी स्पष्ट केले की, भाजपा विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना या निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता नाही. जात प्रमाणपत्राशी संबंधित न्यायालयीन प्रकरण याचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२० मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उचलण्यात आले. या विषयी त्यांना न्यायालयातही आव्हान देण्यात आले. यामुळे भाजपाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सोलापुरात भाजपा नक्कीच तगडा उमेदवार उभा करेल असा विश्वास आहे. या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये भाजपाचे सोलापूरचे प्रभारी आणि माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, सध्यातरी पक्षाच्या उमेदवाराबाबत औपचारिक निर्णयाची प्रतीक्षा आहे.

भाजपामधील राजकीय व्यवस्थापक म्हणाले, “सोलापुरात भाजपाचा संघटनात्मक पाया मजबूत आहे. योग्य उमेदवारासह या ठिकाणी आपली जागा टिकवून ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ”

सोलापुरात भाजपाची रणनीती

काँग्रेस पक्ष सुशील कुमार शिंदे आणि त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. वडिलांनीही त्यांच्या मुलीला लोकसभा उमेदवार म्हणून पाठिंबा दर्शवला आहे. प्रणिती शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. युवा नेतृत्व म्हणून त्या महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा बनल्या आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी चार जागा भाजपाकडे, तर एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे आहे.

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत, तर मोहोळ येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने आहेत. सोलापूर उत्तरमध्ये भाजपाचे विजय देशमुख, अक्कलकोटमध्ये भाजपाचे सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिणमध्ये भाजपाचे सुभाष देशमुख आणि पंढरपूरमध्ये भाजपाचे समाधान औताडे आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उतरल्यामुळे भाजपाचा फायदा झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार मते (१५.६८% मते) मिळाली. भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना ५,२४,९५८, वंचित बहुजन आघाडी मते (४८.३३ %) आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांना ३,६६,३७७ (३३.७८%) मते मिळाली. यावेळी शिंदे आणि आंबेडकरांची मते भाजपाच्या एकूण मतांपेक्षा पुढे गेली होती. एकत्रितपणे या मतांची मोजणी होऊ शकत नसली तरी येणाऱ्या काळात भाजपासाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो.

भाजपासमोरील आव्हान

हेही वाचा : रामजन्मभूमीचा स्वातंत्र्यपूर्व काळातील रक्तरंजित इतिहास

सुशील कुमार शिंदे यांनी १९९८, १९९९ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. इतर सहा वेळाही काँग्रेसनेच या जागा जिंकल्या आहेत. सोलपुरात शिंदे यांच्याकडे एक कणखर दलित चेहरा म्हणून पाहिले जाते.

यामुळे त्यांना लढतीत उतरवल्यास काँग्रेससाठी फायद्याचे ठरू शकते. भाजपाला संधी सोडायची नसून हेच त्यांच्यासाठी भीतीचे कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे.