चंद्रशेखर बोबडे

नागपूर: चौदा महिन्याचा तुरुंगावास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या गौप्यस्फोटाने राजकीय वातावरण तापले आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार त्यांना भाजपकडून प्रस्ताव होता तर भाजप नेते म्हणतात देशमुखच पक्षात येण्यास इच्छुक होते. नेमके खरे-खोटे देशमुख आणि भाजपच जाणो, पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी हीच चर्चा होती. राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले देशमुख तो न भरताच परतले होते. आत्ताच्या त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेचा संदर्भ याच घटनेशी जोडला जात आहे.

Pooja tadas and ramdas tadas
सासऱ्याविरोधात सून! कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केलेल्या पूजा तडस निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाने दिली संधी
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ च्या निवडणुका तोंडावर त्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला. भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याने या पक्षातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची मोहीमच त्यावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सुरू केली. एकापाठोपाठ एक राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जात होते. अनिल देशमुख यांच्याही नावाची चर्चा त्यावेळी होती. २०१९ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. काटोल (नागपूर जिल्हा) हा देशमुख यांचा पारंपारिक मतदारसंघ .तेथून ते १९९५ ते २००९ अशा सलग तीन निवडणुका जिंकले होते. २०१४ मध्ये ते पराभूत झाले होते. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीतही ते काटोलमधूनच लढणार हे निश्चित होते. पक्षाने त्यांच्या नावाची घोषणाही केली होती. ४ ऑक्टोबर २०१९ अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच्या एकदिवस आधी देशमुख त्यांच्या हजारो समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी काटोल तालुका कार्यालयात गेले. पण अचानक असे काय झाले की ते अर्ज न भरताच परत आले. तेव्हाच देशमुख भाजपशी संपर्कात आहेत व त्यांना त्या पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अर्ज भरला नाही, ही चर्चा सुरू झाली. देशमुख समर्थकांनी त्याचे खंडन केले. अर्ज स्वीकारण्याची वेळ संपल्याने अर्ज दाखल केला नाही, असे कारण त्यावेळी देण्यात आले होते. जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने देशमुख यांच्या भाजपशी सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती राष्ट्रवादीतील नेत्यांपर्यंत पोहोचवली होती. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही देशमुख यांना अर्ज न भरण्याबाबत विचारणा केली होती. माध्यमांनीही यासंदर्भात वृत्त दिले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख यांना उमेदवारी देण्यास भाजपच्या बड्या नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश टळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देशमुख यांनी अर्ज भरला व ते निवडणूकही जिंकले त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा तेथेच थांबली होती.

हेही वाचा…. ठाकरे गटाच्या आक्रमक आंदोलनांसमोर भाजपाचे मौन

हेही वाचा… ‘कमळ’ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापूरच्या आखाड्यात; सहकार क्षेत्रातही लगबग

मात्र अलीकडेच वर्धा येथील एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट कोला “ माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी मान्य केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. माझा साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन, पण समझोता करणार नाही, असे त्यावेळी सांगितले. आॉर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले होते, तेथेच डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला” असे ते म्हणाले. देशमुखांच्या या विधानानंतर पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चेला सुरूवात झाली. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुखांनाच भाजपध्ये यायचे होते, असा पलटवार केला. गिरीश महाजन म्हणाले, आम्ही अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. अनिल देशमुख यांनी तोंड उघडायला लावू नये, अन्यथा तेच अडचणीत येतील, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला.महाजन आणि बावनकुळे हे जो संदर्भ देत आहेत त्याचा संदर्भ २०१९ च्या अर्ज न भरता परतण्याच्या घटनेशी यातूनच जोडला जातो.