छत्रपती संभाजीनगर: ‘शेटजी -भटजीं’चा पक्ष ही विरोधकांकडून होणारी भारतीय जनता पक्षावरील टीका मोडून काढण्यासाठी सातत्याने काम करणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र बीड जिल्ह्यातील समन्वय समितीच्या मेळाव्यात न लावल्याने नाराजी व्यक्त झाली. या घटनेमुळे भाजपमधील बदललेल्या पक्षीय रचनेची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

‘माधव’ सूत्राला चालना देत मराठा नेत्यांनी पक्षात यावे यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवात केली. एकदा तर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते घडवून आणला होता. ‘छत्रपती शिवाजीराजे यांचे आठवे वंशज’ असे म्हणत तेव्हा भाजपने तुताऱ्या फुंकल्या होत्या. आता मराठा आरक्षणाची मागणी जोरदारपणे पुढे येताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भोवताली मराठा नेत्यांची ढाल उभी केली असताना गोपीनाथ मुंडे यांचे विस्मरण भाजपला परवडेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

हेही वाचा… निवडणुकीपूर्वी सोलापुरात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग?

बीड वगळता अन्य एखाद्या जिल्ह्यात समन्वय समितीच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावणे, राजकीय धबडग्यातील चूक मानली जाणार नाही. मात्र, बीड जिल्ह्यात फलकावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावण्याची कृती राजकीय चूक ठरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानून त्यांचे छायाचित्र फलकावर लावले. बाळासाहेब ठाकरे आणि सोबतीला आनंद दिघे यांची छायाचित्रे फलकावर लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आग्रही असतो आणि गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रासाठी भाजपमधून कोणी आग्रही नसतो, याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

हेही वाचा… कोल्हापुरात अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधातील राजकीय धार वाढली

‘मोदी है तो गॅरंटी है’ या विश्वासातून बाकी कोणी असो की नसो, भाजपचा विजय नक्की असणार आहे, हा संदेश आता रुजलेला आहे. पण भाजप वाढीसाठी झटणारे नेते आता भाजप फलकावर नकोसे झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. याची ओरड होईल असे लक्षात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे एक छायाचित्र नंतर लावण्यात आले. जे काही फलकावर घडते आहे ते बरहुकुम आहे, असेही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नंतर स्पष्ट केले. याचा अर्थ राज्यस्तरावरुन भाजपला घडविणाऱ्या नेतृत्वाचे विस्मरण झाल्याचे स्पष्ट आले आहे.

मुंडे यांनी पक्ष बांधताना अनेक नेत्यांना आवर्जून पुढे आणले. शिवराज पाटीलसारख्या सतत निवडणुका जिंकणाऱ्या नेत्याला पराभूत करणाऱ्या रुपाताई पाटील निलंगेकर यांच्यामागे शक्ती उभी केली. प्रसंगी काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांनी मैत्रसंबंध जपले. भाजपला यश मिळावे म्हणून वसंतराव भागवत यांनी दाखवलेली पायवाट अधिक रुंद करत त्याचा पक्का रस्ता तयार व्हावा यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले. पण आता त्यांचे विस्मरण होते आहे, हे सांगावे लागत आहे. मुंडे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील फलकावरील चुकीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.