बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसला दिलेल्या विरोधी पक्षांच्या एकतेच्या संदेशावर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी निशाणा साधला आहे. रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, नितीश कुमारांना काय झालं आहे?, ते बिहार आणि स्वत:च्या पक्षालाही सांभाळू शकत नाहीत, काँग्रेसही त्यांना हात देत नाही.

याशिवाय रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांना तुम्ही माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे बनू इच्छित आहात का? असा प्रश्नही विचारला आहे. तसेच, नितीश कुमारांच्या पक्षात गोंधळ उडालेला आहे. राज्यावर संकट निर्माण झाले आहे, त्यांचा सहकारी पक्षही त्यांना मदत करत नाही. नितीश कुमार तुम्ही तुमचे हाल माजी पंतप्रधान देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे करू इच्छित आहात का?

नितीश कुमार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले होते की, भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसने पुढे येत विरोधकांच्या एकजुटीबाबत बोललं पाहिजे. नितीश कुमार यांनी म्हटले की जर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजुट झाली तर भाजपाला १०० पेक्षा कमी जागा मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अशात भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी या निवडणुकीत उभी राहिल याची चर्चा आहे. याचबाबत नितीश कुमार यांनी भाष्य केलं असून भाजपाला हरवायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं असं म्हटलं आहे.