ठाणे : एकीकडे भाजपच्या राज्य आणि देश पातळीवरच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील मुंबई, उपनगर आणि विशेषतः कोकण विभागावर वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शतःप्रतिशत भाजपची घोषणा देणाऱ्या भाजपकडे मात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजप लवकरच आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला महायुतीचा उमेदवार म्हणून घोषीत करण्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा… कोकण शिक्षक मतदारसंघ कायम राखण्याचे शेकाप समोर आव्हान

कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघावर भाजप आणि संघप्रणित शिक्षक परिषदेचे वर्चस्व होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचा विजय कायमच निर्विवाद मानला गेला. मात्र गेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा विजय झाला. हा पूर्व आमदार रामनाथ मोते आणि एकुणच शिक्षक परिषदेला धक्का होता. ठाणे जिल्ह्यातील मतांची झालेली विभागणी पाटील यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. त्यानंतर भाजपने या मतदारसंघाच्या बांधणीकडे दुर्लक्ष केले. याच काळात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले बदलापुरचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदारसंघात बांधणी केली. शिवसेनाप्रणि शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क सुरूच ठेवला. याच काळात भाजप मागे पडले. निश्चित धोरण आणि कार्यक्रम नसल्याने शिक्षकांच्या मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी गेल्या काही वर्षात भाजपच्या माध्यमातून अवघ्या काही मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या नियोजनाचे तीनतेरा वाजल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडे ताकद असलेला उमेदवार नाही.

हेही वाचा… अकोल्यातील नेत्यांना सत्ताधारी पक्षाचे वेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणामी आता ऐनवेळी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन पराभव स्विकारायचा सहकारी पक्षाच्या एखाद्या ताकदवान उमेदवाराला पक्षात घेऊन उमेदवारी द्यायची यावर भाजपात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. शिवसनेप्रणित शिक्षक सेनेचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गेली सहा वर्ष सातत्यपूर्ण केलेली कामगिरी, गेल्या निवडणुकीतील मते आणि निवडणुकीचे व्यवस्थापन या जमेच्या बाजुमुळे त्यांना भाजपात किंवा युतीचा उमेदवार म्हणून घोषीत केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या निमित्ताने पालिका स्तरावर मजबूत होणाऱ्या भाजपला विभागीय निवडणुकांमध्ये मात्र मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले आहे.