नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काय विधान केले ते मी ऐकलेले नाही. पण, खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. मात्र त्यांचा पक्ष प्रवेशाविषयीचा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली.
हेही वाचा : PM Modi Election Rallies: हरियाणात विजय मिळवणं भाजपासाठी महत्त्वाचं का? ही आहेत तीन कारणे…
ते शनिवारी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपत अधिकृत प्रवेश झाला नसला तरी त्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. तो निर्णय आम्हाला मान्य आहे. पण, प्रत्यक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय गणेश उत्सवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेतला जाईल.