संतोष प्रधान

विधान भवनाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येणारी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फारच जिव्हारी लागलेली दिसते. कारण सोमवारी धनंजय मुंडे यांना सुनावल्यावर मंगळवारी शेतकऱ्यांच्या मदतीवरील उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला. 

तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत, पण मी कोणाच्या उगागच मागे लागणार नाही. किती सहन करायचे यालाही मर्यादा असतात. माझा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. तसेच हा इशारा नाही हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे यांना उद्देशून मुख्यमंत्री शिंदे यांनी दया, प्रेम, करुणा दाखविली जाणार नाही, मंगळवारी असे सुनावले होते. त्याबद्दल विरोधी पक्षनेेते अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली. बोलताना मर्यादा पाळायल्या हव्यात, असेही अजितदादांनी मत व्यक्त केले.