हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारादरम्यान बिलासपूर जिल्ह्यातील श्री नैना देवीजी मतदारसंघाची बरीच चर्चा रंगली आहे. या मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपा उमेदवार दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह हिमाचल प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांच्या विकाककामांचा दाखला देत मतदारांना साद घालत आहेत.

Himachal Pradesh Election : “कमळाच्या फूलाला केलेलं मतदान आशीर्वादाच्या रुपाने मला मिळेल”, पंतप्रधान मोदींचे आवाहन

इंदिरा गांधी आणि विरभद्र सिंग यांनी हिमाचल प्रदेशचा विकास घडवून आणल्याचे काँग्रेस उमेदवार राम लाल ठाकूर यांनी म्हटले आहे. तीनदा मंत्रीपद भुषवलेले आणि पाचदा आमदार राहिलेले ठाकूर श्री नैना देवीजी या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. इंदिरा गांधींनी २५ जानेवारी १९७१ मध्ये हिमाचल प्रदेशला देशाचं १८ वं राज्य म्हणून घोषित केल्यानंतर या राज्याचा विकास झाला, असे ठाकूर म्हणाले आहेत.

८ लाख नोकऱ्या, ३ गॅस सिलिंडर मोफत अन् बरंच काही, भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

तर दुसरीकडे भाजपाच्या काळात राबवण्यात आलेले प्रकल्प आणि योजनांनी राज्याचा कायापालट केल्याचा दावा भाजपा उमेदवार रणधीर शर्मा यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ सुरू केल्यानं राज्यातील रस्त्यांचं जाळं गावांपर्यंत पोहोचलं, असं कौतुक करत शर्मा यांनी काँग्रेसनं कोणती कल्याणकारी योजना राबवली, असा प्रश्न विचारला आहे. शर्मा यांनी दोनदा आमदारकी भूषवली असून त्यांना २०१७ मध्ये या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता.

Himachal Pradesh Assembly Election 2022 : भाजपा -काँग्रेसमध्ये ‘काँटे की टक्कर’ !, हिमाचलमधील ‘या’ खास जागेवर दोन महिला उमेदवारांत लढत, कोण बाजी मारणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाने १०० दिवसात महागाई संपवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनासह तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या पक्षाचे लोक आता रामाच्या नावाचा आसरा घेत मतं मागत आहेत. राम आमचाही असून कुठली खाजगी कंपनी नाही”, असा पटलवार शर्मा यांच्या विधानानंतर ठाकूर यांनी केला आहे. दरम्यान, येत्या १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाचा पारडं जड असलं, तरी काँग्रेसकडून विजयासाठी कडवी टक्कर देण्यात येत आहे.