केरळच्या कालिकत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मृदा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. अब्दुल सलाम यांना भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. खरं तर अब्दुल सलाम यांना तिकीट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. त्यावरून भाजपाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. या टीकेवर भाजपाने म्हटले की, त्यांना मुस्लिम समाजाची मते मिळत नाहीत, त्यामुळे मुस्लिम उमेदवार उभे करीत नाही. केरळ राज्यातील भाजपाचे एकमेव मुस्लिम उमेदवार डॉ. अब्दुल सलाम यांच्यासाठी मलप्पुरम मतदारसंघातील प्रचाराचा प्रत्येक दिवस कठीण जात आहे. कारण इथे ६८. ३ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम समुदाय आहे.

मलप्पुरम शहरातील मदीन मशिदीत ईदच्या नमाजला गेल्यानंतर त्यांना आलेला तिथला कटू अनुभव त्यांनी सांगितला. पुलिक्कलजवळील एका दुर्गम गावात मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. नमाजनंतर मी मशिदीच्या बाहेर आलो आणि ईदच्या शुभेच्छा देत असताना एका ६० वर्षीय व्यक्तीने माझा अपमान केला आणि मला देशद्रोही म्हटले. माझ्या आजूबाजूचे लोक गप्प राहिले. मला मनातून खूप वेदना झाल्या. कारण मीदेखील मुस्लिम आहे, पण मी भाजपामध्ये आल्यामुळे ते माझ्याशी असे वागतात,” असे सलाम म्हणतात.

विशेष म्हणजे सलाम शैक्षणिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळच्या कालिकत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांना केवळ त्यांच्याच समुदायाकडूनच नव्हे तर मलप्पुरममधील त्यांच्या पक्षाच्या यंत्रणेकडूनही आव्हानांचा सामना करावा लागतो आहे, असे ते म्हणतात. विशेष म्हणजे सलाम हे पंतप्रधान मोदींची स्तुती करताना कधीही थकत नाहीत. “ते एक असं व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी मला मंत्रमुग्ध केले आहे,” असेही पंतप्रधानांची स्तुती करताना सलाम सांगतात.

हेही वाचाः कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव

खरं तर संपूर्ण जग मोदींभोवती फिरत आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी, त्यांचे ध्येय आणि त्यांच्या कार्याची हीच खरी ताकद आहे. सर्वांनाबरोबर घेऊन चालण्याची त्याची भावना आहे. ते संपूर्ण देशाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात. तुम्ही अशा कोणत्याही नेत्याचे नाव सांगा, मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. गेल्या २१ वर्षांपासून मी त्यांना गुजरात ते दिल्लीपर्यंत येताना पाहिले आहे. मोदींच्या कथित मुस्लिमविरोधी प्रतिमेवर सलाम म्हणतात, “हे मोदीविरोधी लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. कोणत्याही घटनेला ते कधीच थेट जबाबदार नव्हते. हे सर्व मुद्दामहून तयार करण्यात आले आहे. सलाम त्यांच्या प्रचार सभेतील भाषणांमध्ये NDA सरकारने राबवलेल्या विकासात्मक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करीत असतात. मंगळवारी त्यांच्या प्रचाराची सुरुवात कोंडोट्टीजवळील कोलाथूर येथील कॉन्व्हेंट शाळेला भेट देऊन झाली, जिथे त्यांनी निर्मला भवनाच्या सिस्टर अँसी यांची भेट घेतली. संभाषणानंतर ते मूथेदाथू गावात सभेसाठी रवाना झाले होते. त्यांनी स्थानिक आरएसएस नेत्याच्या घरी संपर्क साधला असता तेव्हा अवघे २५ लोक उपस्थित होते, त्यातील निम्मी मुले होती. आपले भाषण संपवताना त्यांनी फक्त भाजपा-आरएसएसच्या बालेकिल्ल्यांमध्येच प्रचार सभा घेण्याबाबत निराशा व्यक्त केली.

हेही वाचाः New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे महिला मोर्चाच्या नेत्यांच्या एका गटाने त्यांना संध्याकाळी त्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास सांगितले, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. “मला बरं वाटत नसल्याचंही त्यांनी कारण सांगितलं. जेव्हा स्थानिक भाजपा नेत्यांनी तिकडच्या दोन मंदिरांना भेट द्या, असे सांगितले तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला. अशा भेटींचा अर्थ काय आहे? तो वेळेचा अपव्यय आहे, असंही त्यांनी सांगितले. तसेच ते हॉटेलमधील आपल्या खोलीत गेले, पण महिला मोर्चाच्या नेत्यांच्या जिद्द कायम होती. त्यामुळे सायंकाळी ते कोंडोट्टी येथे परतले आणि संमेलनाला उपस्थित राहिले. परत येताना त्यांनी कोट्टाकुन्नू पार्क येथे महिलांच्या एका गटाला उमेदवारीचे कार्ड दिले, तेव्हा काहींनी त्यांना मतदान करण्याचे आश्वासन दिले, तर काहींनी ते कार्ड स्वीकारण्यासही नकार दिला.