अलिबाग : काही दिवसांपूर्वीच कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केले होते. आता शिवसेना शिंदे गटाने त्याच मैदानाववर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेऊन उत्तर दिले. दोन्ही सत्ताधारी पक्षातील धुसफूस पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आली. विशेष म्हणजे मोदी वा फडणवीस यांचे कौतुक केलेल्या शिंदे यांनी अजित पवार यांचा साधा नामोल्लेखही केला नाही.

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद नवे नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला या वादाची किनार होती. आता महायुती सरकार मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सत्तेत आल्याने, रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची मोठीच अडचण झाली आहे. पण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर थेट शाब्दीक हल्ले चढवण्याचे तुर्तास थांबवले असले तरी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे काम सूरूच ठेवले आहे.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयोध्येनंतर नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवात शक्तीप्रदर्शन

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत खालापूर आमदार आहेत. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा डोळा आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहीलेल्या सुधाकर घारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. गेल्या महिन्यात कर्जत पोलीस मैदानावर निर्धार मेळावा घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या या मेळाव्याला अभूतपूर्व मेळावा असे संबोधण्यात आले होते. मावळमधून लोकसभेला पार्थ पवार आणि कर्जत मधून विधानसभेला सुधाकर घारे या प्रतिनिधीत्व देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. यावर आधी लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूकीला आपण एनडीएचा घटकपक्ष म्हणून सामोरे जाणार आहोत. जो उमेदवार दिला जाईल त्याचा पाठीशी ताकदीने उभे रहा, विधानसभा निवडणूकीचे नंतर बघू, तुमची मागणी माझ्या लक्षात आली आहे. असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

हेही वाचा : पालघरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची !

राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटानेही याच मैदानावर जाहीर सभा घेऊन त्याला प्रतिउत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला शिवसनेनेनी लाखोंची गर्दी जमवली. यावेळी कर्जत पोलीस ग्राऊंडवर अनेक सभा झाल्या काही सभांना अभूतपूर्व सभा म्हणून संबोधले गेले. पण ही सभा न भूतो न भविष्यती अशी आहे असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला अर्थातच त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळाव्याच्या सभेकडे होतो. मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांनी यावेळी हा जनसागर, पाहील्यानंतर गर्दीच्या महापूरात सर्व विरोधक वाहून जातील, कमी वेळात थोरवे यांनी विकास कामांचा डोंगर उभा केलाय. निधी कसा आणायचा हे महेंद्र थोरवे यांना माहित आहे असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला.

हेही वाचा : ईडीचा ससेमिरा, शरद पवारांचे नातू अन् राष्ट्रवादीचे उदयोन्मुख स्टार; कोण आहेत रोहित पवार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतूक केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पावर यांच्यावर भाष्य करणे टाळले. त्यामुळे दोन्ही घटक पक्षातील सुप्त संघर्ष या निमित्ताने पून्हा एकदा दिसून आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर येते का, याकडे रायगडकरांचे लक्ष असणार आहेत.