८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा दिला. त्यांनी एक प्रकारे हिंदूंनी मतदानासाठी एकोपा दाखवला पाहिजे हेच सुचवलं आहे. धुळे या ठिकाणी म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात हा नारा देण्यात आला. धुळ्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. आता भाजपासमोरची आव्हानं वाढत असल्याने मोदींनी हा नारा दिला असल्याचं बोललं जातं आहे.

धुळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल गोटे

धुळ्यात सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अनिल गोटे यांना तिकिट दिलं आहे. अनिल गोटे यांनी तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. अनिल गोटे हे वादग्रस्त ठरले होते कारण ते आधी पत्रकार होते. तसंच राजकीय फायरब्रँड असं त्यांचं वर्णन केलं जातं. अब्दुल करीम तेलगी मुद्रांक घोटाळ्यातल्या आरोपींपैकी अनिल गोटे हे एक होते. मुद्रांक घोटाळ्यातल्या कथित सहभागाच्या आरोपांमुळे त्यांना चार वर्षे तुरुंगात घालवावी लागत होती. तेलगीला मुद्रांक विक्री परवाना मिळाला पाहिजे म्हणून राजकीय प्रभावाचा वापर अनिल गोटेंनी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

अनिल गोटेंची राजकीय पार्श्वभूमी काय?

राजकीय महत्वकांक्षेमुळे अनिल गोटे यांनी गंभीर चूक केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटही पाडली होती आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नही केला. मात्र ही त्यांच्या आयुष्यातली चूक ठरली होती. त्यानंतरच त्यांच्या राजकीय पतनाची सुरुवात झाली होती. अनिल गोटे यांना चार वर्षांनी म्हणजेच २००७ मध्ये जामीन मिळाला. दोन वर्षांनी त्यांनी निवडणूक जिंकली आणि राजकारणात पुनरागमन केलं. २०१४ मध्ये अनिल गोटेंनी भाजपात प्रवेश केला होता आणि ते पुन्हा विजयी झाले. २०१८ मध्ये त्यांचे भाजपाशी मतभेद झाले आणि त्यांनी भाजपाची साथ सोडली. २०१९ मध्ये अनिल गोटेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्या निवडणुकीत एआयएमआयएम फारुख शाह निवडून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मध्ये जे झालं त्यानंतर आता भाजपाने धुळ्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे

२०१९ मध्ये एआयएमआयमचा विजय झाल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा धुळ्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. अनिल गोटे आणि फारुक शाह यांना आव्हान देण्यासाठी आता भाजपाने पक्षाचे निष्ठावान नेते अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये धुळ्यात एआयएमआयएमचा विजय झाल्याने भाजपासह प्रस्थापित पक्षांना धक्का बसला. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे. अनिल गोटे आणि अनुप अग्रवाल यांच्यात हिंदू मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. अशात फारुक शाह यांच्या विरोधात समाजवादी पक्षानेही उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता तेलगी घोटाळ्यातील कथित आरोपीचा प्रचार केला जात असतानाच भाजपाने एक है तो सेफ है चा नारा दिला आहे. ज्याचं कारण काय ते आता स्पष्ट झालं आहे.