मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर आपल्याला खायला मिळते का, याची गिधाडे वाट पाहात असतात. तशीच राजकीय गिधाडवृत्ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. आपण स्वत: काही करायचे नाही, पण एखादी घटना, दुर्घटना घडली की त्यावर राजकीय पोळी भाजण्याचे काम ठाकरे गटाकडून करण्यात येते, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी येथे केली.

हेही वाचा : “पुतळ्याच्या घटनेचे राजकारण नको”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मोदी-शहांचे दलाल ’ असे याप्रकरणी संबोधणाऱ्या ठाकरे यांनी भाषा जपून वापरावी, आम्हालाही कामाठीपुऱ्यातील भाषा येते, असा इशारा शेलार यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना ही दुर्दैवी असून मनात संताप निर्माण करणारी आहे. हा एक अपघात होता. सरकारने बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून मीही सरकारच्या वतीने माफी मागितली आहे व आजही पुन्हा मागतो. याप्रकरणी कोण दोषी आहे, हे चौकशीनंतर निष्पन्न होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल. यात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. पुन्हा उत्तम दर्जाचे स्मारक उभारण्यात येईल, असे शेलार यांनी नमूद केले. पुतळ्याबाबत जे आज आरोप करीत आहेत, त्यांनी त्यावेळी कधीही सूचना केल्या नाहीत किंवा सरकारच्या चुका दाखविल्या नाहीत व पुतळ्याला अभिवादन करण्यासही गेले नाहीत. मात्र दुर्घटना घडताच गिधाडासारखे राजकारण करीत आहेत. भग्न पुतळ्याची छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांचे हेच का शिवप्रेम, असा सवालही शेलार यांनी केला.