ठाणे : शिवसेनेतील ऐतिहासीक फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झालेल्या सात खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले असले तरी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांचा सहभाग का नाही याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांना उमेदवारी नाकारल्यानंतरही ही जागा शिंदे यांनी स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले आहे. असे असले तरी अजूनही नाशीक, वाशीम, पालघर आणि वायव्य मुंबई पाच खासदारांच्या उमेदवारीचे भवितव्य अजूनही अंधातरीत आहे. या जागांसह प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर जोपर्यत निर्णय होत नाही तोवर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डाॅ.श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करायची नाही अशी स्पष्ट रणनिती शिंदे यांच्या गोटात ठरली असून किमान १४ जागा तरी आपल्या पक्षाला मिळायलाच हव्यात असा आग्रह महायुतीच्या बैठकीत धरण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राहूल शेवाळे ( मुंबई दक्षिण मध्य), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), प्रतापराव जाधव ( बुलढाणा), हेमंत पाटील (हिंगोली), श्रीरंग बारणे (मावळ), कृपाल तुमाणे ( रामटेक), धैर्यशिल माने (हातकंणगले), हेमंत गोडसे (नाशीक), भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), राजेंद्र गावित (पालघर) आणि गजानन किर्तीकर (वायव्य मुंबई) हे १२ खासदार त्यांच्यासोबत आले. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी या खासदारांना शिंदे यांच्या गोटात खेचण्यात महत्वाची भूमीका बजावली होती. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे डाॅ.श्रीकांत यांचे निकटवर्तीय मानले जातात. बंडाचे नेपथ्य रचण्यात शिंदे यांच्यासोबत हेमंत पाटील पहिल्या दिवसापासून होते. असे असताना महायुतीच्या जागा वाटपात हिंगोलीच्या जागेवरही भाजपने दावा सांगितल्याची चर्चा होती. याशिवाय कोल्हापूर, हातकणंगले, रामटेक, शिर्डी, नााशीक, पालघर, वायव्य मुंबई या मतदारसंघातील उमेदवार बदला अथवा जागा आमच्याकडे द्या असा आग्रह भाजपकडून धरला गेल्याचे बोलले जात होते. दक्षिण मुंबई, ठाणे, संभाजीनगर या मतदारसंघांवरही भाजपचा दावा आहे. भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमीकेमुळे शिंदे गटातील खासदारांमध्ये कमालिची अस्वस्थता होती. ‘मोठ्या विश्वासाने आम्ही तुमच्यासोबत आलो परंतु आमची उमेदवारी धोक्यात आल्याच्या बातम्या आम्ही वाचत आहोत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना आवरा’ या शब्दात या खासदारांनी शिंदे पिता-पुत्रांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले होते. ही अस्वस्थता टोकाला पोहचू लागल्याने पक्षातील काही मंत्री तसेच आमदारांनीही आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केल्याची चर्चा होती.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Sangli, dilemma, Sanjay Raut, lok sabha election 202, shiv sena, congress
सांगली दौऱ्यात संजय राऊत यांची चोहोबाजूने कोंडी
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात
cm eknath shinde supporters holding public meetings to create pressure on bjp for thane lok sabha seat
Lok Sabha Election 2024: भाजपवर दबावासाठी शिंदे सेनेच्या दंड बैठका

हेही वाचा : महायुतीत औरंगाबाद लोकसभेचा तिढा कायम

शिंदेंचे कल्याण अखेरच्या टप्प्यात

महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला हवे असलेले मतदारसंघ आणि उमेदवार पदरात पाडून घेतले असले तरी नाशीक, यवतमाळ-वाशीम, वायव्य मुंबई, पालघर आणि ठाणे मतदारसंघावरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. यवतमाळमध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याऐवजी नवा उमेदवार द्या असा भाजपचा आग्रह असल्याचे सांगण्यात येते. नाशीकमध्येही हेमंत गोडसे यांना उमेदवारी नको तसेच पालघर, ठाणे या दोन्ही मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार असेल तरच आम्ही मदत करु असा प्रस्ताव तेथील बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी ठेवल्याचे समजते. दरम्यान उमेदवारी जाहीर न झालेल्या अन्य खासदारांच्या भवितव्याविषयी स्पष्टता येत नाही तोवर स्वत:ची उमेदवारी जाहीर करु नये असा आग्रह कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी धरल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळेच पहिल्या यादीच मुख्यमंत्री पुत्राच्या नावाचा समावेश झालेला नाही. असे असले तरी कल्याणमधून तेच उमेदवार असतील असा दावा पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने केला. कोणत्याही परिस्थितीत ठाणे भाजपला दिले जाऊ नये असाच पक्षात मतप्रवाह असून मुख्यमंत्र्यांनीही तशी स्पष्ट भूमीका महायुतीच्या बैठकीत मांडल्याचे समजते.

हेही वाचा : हातकणंगलेत शेतकरी नेत्यांची भाऊगर्दी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग सोडले, वायव्य मुंबईसाठी आग्रह

दरम्यान जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरु असताना रत्नागिरी-सिंधुदूर्ग हा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्याची तयारी मुख्यमंत्र्यांच्या गोटातून दाखविण्यात आली आहे. येथून भाजप नेते नारायण राणे यांची उमेदवारी त्यामुळे पक्की मानली जात असून उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधु किरण या दोघांची समजूत काढण्यात आली आहे. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीमुळे गजानन किर्तीकर यांना उमेदवारी देऊ नये असे महायुतीच्या गोटात ठरते आहे. मात्र वायव्य मुंबईचा आग्रह धरत असताना येथून अभिनेते गोविंदाला रिंगण्यात उतरविण्याची तयारी केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.