माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदींना उघडपणे पाठिंबा देत पक्षाच्या हितापेक्षा देशाचे हित महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपला मुद्दा प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलं. प्रमोद कृष्णम म्हणाले, प्रियंका गांधींना काँग्रेसमध्ये स्वत:ला वाचवावे लागणार आहे. मी काय बोललो, का बोललो आणि कसे बोललो याचा अर्थ इथे बसलेल्या प्रत्येकाला समजेल. इतकंच म्हणणं पुरेसं आहे, असंही ते म्हणालेत. टाइम्स नाऊ नवभारत यांनी आचार्य प्रमोद कृष्णम यांची विशेष मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राम मंदिराचे निमंत्रण स्वीकारणे गुन्हा आहे का?

राममंदिर प्राणप्रतिष्ठेत जाण्याच्या प्रश्नावर आचार्य म्हणाले की, राम मंदिराचे निमंत्रण स्वीकारणे हा गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा मी भोगायला तयार आहे. मला मिळालेल्या शिक्षेबद्दल मी काँग्रेसचा आभारी आहे, ज्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर काढले, त्यांचा मी ऋणी आहे. काँग्रेसने ते नाकारले, पण देशाने ते स्वीकारले याबद्दल मी देशाचा आभारी आहे.

हेही वाचाः भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सोमनाथ भारती?

राम हा भारताचा आत्मा आहे

कल्की धामच्या मार्गात कोण येत राहिले या प्रश्नावर आचार्य प्रमोद म्हणाले की, प्रश्न भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा आहे. राम हा भारताचा आत्मा आहे. सनातन आणि राम यांच्याशिवाय भारताची कल्पना करता येत नाही. राम, गाय, गंगा, गायत्री याविषयी बोलणारे, छद्म धर्मनिरपेक्ष लोक जेव्हा यावर आक्षेप घेतात, तेव्हा रामाला मिटवण्याची चर्चा होते, त्याचप्रमाणे द्रमुकने हिंदुत्वाला डेंग्यू, मलेरिया म्हटले. हे जे कोणी बोलेल काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहते. या पक्षाचे नेते नेहमीच महात्मा गांधी आणि रामाबद्दल बोलत असतात. रामाचे आमंत्रण नाकारणारा पक्ष भारतात कसा वाढणार हा प्रश्नच असल्याचं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

हेही वाचाः काँग्रेस नेत्यांची पक्ष सोडण्याची मालिका सुरूच! पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा यांचा भाजपात प्रवेश; कारण काय?

देश मोदींच्या पाठीशी आहे

आचार्य म्हणाले, कालपर्यंत मी काँग्रेसबरोबर होतो, आज देशाबरोबर आहे आणि देश मोदींबरोबर आहे. निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर आचार्य म्हणाले, हा वेगळा विषय आहे. उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. काँग्रेसने माझी हकालपट्टी केली. ज्यांनी ते केले आहे, त्यांनी आरशात आपले चेहरे पाहा. ईडीच्या कारवाईबाबतच्या आरोपांवर ते म्हणाले, मी ९ वर्षांपासून भाजपाच्या विरोधात होतो, जर त्यांना मला घाबरवायचे असते तर त्यांनी मलाही घाबरवले असते. उत्तर प्रदेश राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये किती आमदारांनी निषेधार्थ मतदान केले, कितीवर कारवाई झाली? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

मी नरेंद्र मोदींबरोबरच राहीन

माझ्या आयुष्यातील उरलेल्या क्षणांमध्ये मी नरेंद्र मोदींबरोबर राहीन, असे आचार्य म्हणाले. तीन वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांनी मला ऑफर दिली होती, तेव्हा मी नाही म्हणालो होतो, मी काँग्रेस सोडू शकत नाही, असं त्यांना सांगितलं होतं. शक्ती एवढी मोठी नाही की माणूस आपली विवेकबुद्धी गहाण ठेवून ती मिळवू शकेल. सार्वजनिक जीवनात मी जे काही बोललो ते रेकॉर्डवर आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की, ज्या देशात नेहरूंपासून आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले आहेत, त्या देशात सर्व चांगले होते, पण पंतप्रधान मोदी नसते तर हे तीन निर्णय घेता आले नसते.

मोदी पंतप्रधान नसते तर…

ते म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिर बांधले गेले, पण पंतप्रधान मोदी नसते तर मंदिर बनले नसते. १८ वर्षे कल्की धामचा संघर्ष सुरू राहिला, उच्च न्यायालयाने बाजूने निकाल दिला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर पायाभरणी झालीच नसती. कलम ३७० हटवण्याचा निर्णय भाजपाचे पंतप्रधान असतानाही घेतला नसता तर देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असते. पंतप्रधान हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वांचा असतो. आचार्य प्रमोद म्हणाले, पंतप्रधान हा कोणा एका पक्षाचा नसून सर्वांचा असतो. त्यामुळे मी कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. निमंत्रण देणे आणि भेटणे गुन्हा असेल तर राहुल गांधी यांनी संसदेतही मोदींची गळाभेट घेतली होती. पंतप्रधान अखिलेश यादव यांच्या घरी एका कार्यक्रमाला गेले होते, पंतप्रधान मोदी दिग्विजय सिंह यांच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमालाही गेले होते, असंही ते म्हणाले आहेत.