जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी शनिवारी मोठं विधान केलं आहे. भारतातील मुस्लीम संघटना भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या विरोधात नाहीत. परंतु त्यांच्यातील वैचारिक मतभेद कायम आहेत. महमूद मदनी म्हणाले की, सध्या देशात चुकीचा हिंदुत्ववाद पसरवला जात आहे. हिंदुत्वाचं सध्याचं स्वरूप भारताच्या ऐक्याच्या विरोधातील आहे. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू असलेल्या जमियतच्या ३४व्या महाअधिवेशनात बोलत होते.

‘भाजपा-आरएसएसला आमचा विरोध नाही’- महमूद मदनी

यावेळी जमियतचे प्रमुख मदनी म्हणाले, “आरएसएसचे विचार अडचण निर्माण करणारे आहेत. पण सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या अलीकडेच केलेल्या विधानांकडेही दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. दोन समुदायातील मतभेद दूर करण्यासाठी संघ प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचं आम्ही स्वागत करू, असंही महमूद मदनी म्हणाले.

हेही वाचा- Viral Video: “भीक नका मागू, एका हातात कुराण अन् दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घ्या मग…”, पाक सरकारला कट्टरपंथीयांचा सल्ला

मौलाना मदनी पुढे म्हणाले, “आम्ही आरएसएस किंवा भाजपाच्या विरोधात नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. सर्व नागरिक समान आहेत. देशात शिक्षणाचं भगवीकरण होत आहे. पण एखाद्या विशिष्ट धर्माची पुस्तके इतरांवर लादली जाऊ नयेत. हे मुस्लिमांसाठी अस्वीकार्य आहे. शिवाय हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.”

हेही वाचा- …अन् भाजपा नेत्यांना गायीने लाथाडलं, ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१४० कोटी लोकांचा हा देश विविधतेनं नटलेला आहे, तरीही आपण एकसंध आहोत. यात मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमची मूळं या देशातच आहेत. आमचा लढा या देशातील बहुसंख्यांविरोधात नाही. आमच्यात मनभेद नाहीत, मतभेद आहेत. हे मतभेद लोकांच्या ठरावीक वर्गाशी आहेत,” असंही महमूद म्हणाले.