२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र आले असले तरी, अद्याप त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला नाही. पंतप्रधानपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री तथा जदयू पक्षाचे नेते नितीशकुमार हे इच्छुक असल्याचे म्हटले जाते. या सर्व राजकीय परिस्थिच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बिहारमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुस्लीम समाजाच्या मतदारांकडे विशेष लक्ष दिले आहे.

यात्रा एकूण २७ जिल्ह्यांमधून जाणार

जदयू पक्षाने मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका यात्रेला सुरुवात केली आहे. ‘कारवा ए इत्तेहाद आणि भाईचारा यात्रा’ असे या यात्रेचे नाव आहे. १ ऑगस्टपासून या यात्रेला पश्चिम चंपारणमधील नरकाटियागंज येथून सुरुवात करण्यात आली आहे. ही यात्रा एका महिन्यात बिहारमधील ३८ पैकी एकूण २७ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. या २७ जिल्ह्यांत मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. या यात्रेचे नेतृत्व जदयूचे आमदार खालीद अन्वर हे करणार असून जदयू पक्षाचे इतर नेते तसेच बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नेते यात्रेदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. या यात्रेत अल्पसंख्याक कल्याणमंत्री झामा खान हेदेखील सहभागी होणार आहेत. दरम्यान या यात्रेत नितीश कुमार मात्र सहभागी होणार नाहीत.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नितीश कुमार पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी शरीफ आणि सासाराम येथे जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. याच कारणामुळे जातीय समीकरण साधण्यासाठी जदयू पक्षातर्फे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात नितीश कुमार यांनी भाजपा प्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी राजद, काँग्रेस तसेच इतर पक्षांना सोबत घेत महायुतीच्या माध्यमातून बिहारमध्ये नव्या सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर आता या यात्रेच्या माध्यमातून जदयू पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या यात्रेच्या माध्यमातून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नितीश कुमार यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

“मुस्लीम समाज कठीण काळातून जातोय”

दरम्यान, या यात्रेचा शुभारंभ करताना खालीद अन्वर यांनी जमलेल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजावर अन्याय होत असल्याचे सांगितले. “सध्या मुस्लीम समाज कठीण काळातून जात आहे. आपण काय परिधान करतो, काय खातो यावर नजर ठेवली जात आहे. सध्याची परिस्थिती ही गंगा-जमुना संस्कृतीच्या विपरित आहे. याच कारणामुळे आपल्याला आता जागे होण्याची वेळ आले आहे. आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून कोणाच्या सांगण्यावरून भडकण्याचे टाळले पाहिजे” असे अन्वर म्हणाले. त्यांनी नितीश कुमार यांनी मागील १८ वर्षांत मुस्लीम समाजासाठी आतापर्यंत खूप काही केलेले आहे, असेदेखील सांगितले.

यात्रा कोणकोणत्या भागातून मार्गक्रमण करणार?

दरम्यान, ही यात्रा उत्तर बिहारमधील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शेओहार, सीतामढी आणि सिवान या भागांचा समावेश आहे. ही यात्रा मिथिलांचल भागातील दरभंगा आणि मधुबनी या ठिकाणाहूनही मार्गक्रमण करेल. सीमांचलमधील किशनगंज, कटिहार, अररिया आणि पूर्णिया या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल. या भागांत ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम आहेत.