झारखंडमध्ये रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि रस्ते दुरुस्तीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. येथे काँग्रेसने आंदलोनच्या माध्यमातून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसचे आंदोलन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात होते, असा दावा भाजपाने केला आहे.

हेही वाचा >> Congress president election: ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ

हगामाच्या काँग्रेसच्या आमदार दीपिका पांडे सिंह यांनी मेहरमा-बराहत मार्गावरील पिरोजपूर चौकात बुधवारी (२१ सप्टेंबर) अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात दीपिका पांडे सिंह यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते गोड्डा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-१३३ वरील खड्ड्यांत बसले. यावेळी जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत आम्ही या येथून उठणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता.

हेही वाचा >> मुस्लीम नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व…”

काँग्रेसने केलेल्या या आंदोलनाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपूर्वीच ७५ कोटी रुपये दिले आहेत. राष्ट्रीय महामार्गांची देखभाल करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची नसून राज्य सरकारची आहे. काँग्रेसचे हे आंदोलन मुख्यमंत्री हेमंत सोरने यांच्याविरोधात होते, असा दावा दुबे यांनी केला आहे.

हेही वाचा >> मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत; सरसंघचालकांच्या मशीद भेटीनंतर मुस्लिमांच्या सर्वोच्च नेत्याचे गौरवोद्गार

या दाव्यानंतर दीपिका पांडे सिंह यांनी यांनी दुबे यांच्यावर सडकून टीका केली. तुमच्या सवयीनुसार तुम्ही दुसऱ्यांना दोष देत आहात. रस्त्यांच्या समस्येवर काहीतरी ठोस उपायोजना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. केंद्रामध्ये तुमचे सरकार आहे. असे असताना राज्यात रस्त्यांची अवस्था अशी का झाली, असा सवाल दीपिका पांडे सिंह यांनी केला.