नागपूर: देशात महत्त्वाच्या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार, याबाबत उत्सुकता आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. जगातील आंबेडकरवाद्यांचे प्रेरणास्थान असलेली दीक्षाभूमी आहे. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नेत्यांच्या गटबाजीमुळे पक्षाच्या हातून गेला. २०१४ मध्ये नितीन गडकरी यांनी २ लाख ८४ हजार ८४८ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला होता. त्यांनी नागपूरमधून सलग चारवेळा विजयी झालेले काँग्रेसचे विलास मुत्तेमवार (प्राप्त मते ३ लाख २९१९) यांचा पराभव केला होता. गडकरी यांनी ५ लाख ८७ हजार ७६७ (झालेल्या मतदानापैकी ५४.१७ टक्के) मते घेतली होती. या निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये तब्बल १५.६८ टक्के वाढ झाली होती. काँग्रेसवर मतदारांची असलेली नाराजी आणि गडकरींचे स्वत:चे वलय याचा फायदा भाजपला झाला होता. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे भाजपला त्यांच्या पारंपारिक मतांशिवाय इतर समाजाकडूनही घवघवीत मतदान झाले होते.

Forest Minister Sudhir Mungantiwar controversial statement while criticizing Congress got trolls on social media
काँग्रेसवर टीका करताना वनमंत्री मुनगंटीवारांची जीभ घसरली, समाजमाध्यमांवर ट्रोल
Take opposition money but vote for Mahavikas Aghadi says Shiv Sena candidate Sanjog Waghere
पिंपरी: विरोधकांचे पैसे घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा- शिवसेना उमेदवार संजोग वाघेरे
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप
vikas Thackeray
गडकरींच्या विरुद्ध लढणारे ठाकरे पवारांच्या भेटीला

हेही वाचा – सावधान! विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

गडकरीच्या रुपात दुसऱ्यांदा संघभूमीत भाजपला विजय मिळवता आला होता. गडकरी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर त्यांनी त्यांच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून शहराचे रूपच पालटले. उड्डाण पूल, सिमेंट रस्ते, मेट्रो यासारख्या दृश्यस्वरुपातील कामांमुळे तसेच आयआयएम, ट्रिपल आयटी, एम्स सारख्या राष्ट्रीय संस्थांमुळे नागपूरची ओळख झपाट्याने प्रगत शहरांमध्ये होऊ लागली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता असल्याचा गडकरींना त्यांच्या योजना राबवण्यासाठी फायदा झाला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांना निवडणूक सोपी जाईल, असा अंदाज होता. मात्र काँग्रेसने यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले ओबीसी नेते नाना पटोले यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली.

पटोले नागपूरबाहेरचे होते तरी त्यांनी शहरातील सर्व काँग्रेस नेत्यांची मोट बांधून ओबीसीच्या मुद्यावर भाजपपुढे आव्हान निर्माण केले होते. पण ते केवळ गडकरींचे मताधिक्य ६८ हजाराने कमी करू शकले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये २०१४ च्या तुलनेत फक्त १.५० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले उलट काँग्रेसच्या मतांमध्ये ९.५८ टक्के वाढ नोंदवली गेली. गडकरींना ६ लाख ६० हजार २२१ (५५.६७ टक्के) तर पटोले यांनी गडकरी यांच्यासारखा बलाढ्य उमेदवार पुढे असताना पहिल्याच प्रयत्नात ४ लाख ४४ हजार २१२ (३७.४५ टक्के) मते घेतली होती. त्यामुळे २०२४ ची निवडणूक नाना पटोले महाविकास आघाडीकडून नागपूरमधून लढणार का? याबाबत उत्सुकता आहे. पक्षाने आदेश दिला तर लढू, असे पटोले म्हणतात पण त्यांनी भंडारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सध्यातरी दिसून येते. शिवाय त्यांना दिल्लीऐवजी महाराष्ट्रातील राजकारणात अधिक रस आहे. त्यामुळे पटोले यांनी नकार दिला तर काँग्रेसला दुसरा उमेदवार शोधावा लागेल. पक्षाकडे ३८ अर्ज आले आहेत. पण त्यात एकही मोठे नाव नाही. पक्ष यापैकी कोण्या एकाचा विचार करते की २०१९ प्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून नवा चेहरा देते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान गडकरी यांनी मात्र वर्षभरापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; एक ठार, पंधरा जखमी

२०१९ चा निकाल

१) नितीन गडकरी (भाजप) – ६,६०,२२१
२) नाना पटोले (काँग्रेस) – ४,४४,२१२
३) मोहमंद जमाल (बसप) – ३१,७२५