एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःची उमेदवारी गृहीत धरून जोमाने प्रचार सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता अद्यापि कायम आहे. संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावांची चर्चा सुरू असताना त्यात विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि माजी खासदार ॲड. शरद बनसोडे यांनीही इच्छूक असल्याचे सांगत आपली नावे चर्चेत आणली आहेत.

Jitendra Awhad
शरद पवारांचं घर कोणी फोडलं? अल्लाहची शपथ घेत जितेंद्र आव्हाडांचे ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात

माजी खासदार ॲड. शरद बनसोडे यांनी आपली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत सकारात्मक संदेश मिळाल्यामुळे आपण उमेदवारीसाठी जोराने कामाला लागल्याचे सांगितले. तर दुसरीकडे माजी खासदार अमर साबळे यांनीही फडणवीस यांचीभेट घेऊन सोलापूरच्या खासदारकीसाठी साकडे घातल्याचे सांगितले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी साबळे यांच्या झालेल्या भेटीची दृश्ये त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली आहेत.

हेही वाचा >>> मायावतींच्या बसपला आणखी एक झटका; खासदार संगीता आझाद यांचा पतीसह भाजपात प्रवेश

दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचीही उमेदवारीसाठी चर्चा रंगत आहे. सातपुते हे मूळ संघ परिवारातील असून अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते पुढे आले आहेत. मागील २०१९ च्या माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत भाजप श्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना गळ घालून सातपुते यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली होती. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे जर लोकसभेच्या रणांगणावर असतील तर त्यांचे आव्हान परतवून लावण्याच्या दृष्टीने राम सातपुते यांची उमेदवारी महत्वाची ठरू शकयै, असा मतप्रवाह भाजपसह संघ परिवारात ऐकायला मिळतो.

दिवसेंदिवस सोलापूरच्या भाजप उमेदवारीची उत्सुकता कायम असतानाच पक्षाचा उमेदवार स्थानिक आणि निःसंशय अनुसूचित जातीचाच असावा, त्याचे जात प्रमाणपत्र खोटे ठरू नये, असा आग्रह पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी अलीकडेच पक्षाचे नेते, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीप्रसंगी धरला होता. विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त ठरले आहे. त्यांच्या विरूध्द खोटे जात प्रमाणपत्राबद्दलया पूर्वी फौजदारी गुन्हा दाखल झाला असून त्यांना आठवड्यातून एकदा शहर गुन्हे शाखेत हजेरी लावण्याइतपत नामुष्की ओढवली होती. त्याचा वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा >>> ममतादीदींच्या मर्जीतल्या पोलीस अधिकार्‍याला डच्चू, काय आहे प्रकरण?

२०१४ साली मोदी लाटेत सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सुमारे दीड लाख मतांच्या फरकाने पराभूत करून खासदार झालेले शरदा बनसोडे हे मागील पाच वर्षे पूर्णतः शांत होते. त्यांनी सोलापूरशी संपर्कसुध्दा तोडला होता. मात्र आता ते पुन्हा सक्रिय होऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. मुंबईत शेअर बाजाराशी संबंधित असलेले शरद बनसोडे हे केंद्रीयमंत्री पीयुष गोयल यांच्या दैनंदिन संपर्कात असल्याचे सांगितले जाते.