अलिबाग : अलिबाग मतदारसंघावर पारंपरिकदृष्ट्या शेकाप आणि पाटील कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले असले तरी गेल्या पाच वर्षांत चित्र बदलले आहे. शेकापला अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जावे लागत असतानाच भाऊबंदकीचा फटका पक्षाला बसला आहे. शिवसेना (शिंदे) आणि शेकापमध्ये चुरशीची लढत होत आहे.

काही अपवाद सोडले तर अलिबाग विधानसभा मतदारसंघांवर कायमच शेकापचे वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात पक्षाची मोठी वाताहत झाली आहे. अशातच मतदारसंघातून जयंत पाटील यांनी त्यांचा माजी आमदार सुभाष पाटील यांना डावलत, सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षासह जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पंतप्रधानांकडून ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणा हे देशाचे दुर्दैव; काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचा आरोप

अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून अलिबाग विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. अलिबाग हा पारंपरिकदृष्ट्या शेकापचा बालेकिल्ला. १९६२, १९७२, २००४ आणि २०१९ असे अपवाद सोडले तर या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे कायम वर्चस्व राहिले आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या वर्चस्वाला ओहोटी लागली आहे. पक्षातील जुनेजाणते आणि प्रतिभावान नेते पक्षाची साथ सोडून निघून गेले आहेत. आणि हेच नेते कधी शिवसेनेकडून तर कधी भाजपकडून शेकापला आव्हान देऊ लागले आहेत. शिवसेनेचे (शिंदे) विद्यामान आमदार महेंद्र दळवी आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हेदेखील शेकापच्या मुशीत तयार झाले आहेत.

शेकापचे माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे बंधू सुभाष पाटील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांच्या सुनेला उमेदवारी दिली. त्यामुळे हा निर्णय कसा योग्य होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

लोकसभेतील राजकीय

चित्र ● महायुती : १,१२,६५४ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● महाविकास आघाडी: ७३,६५८