छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने घोषित केलेल्या ४६ हजार कोटी रुपयांपैकी २९ हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला. हा दावा पूर्णत: चुकीचा असून ४६ पैशाचे कामे सुरू असतील तरी ती दाखवावीत आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. सरकार मराठवाडा विरोधी आहे, हे दाखवून देण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> Haryana Election : हरियाणात भाजपाला आणखी एक धक्का; राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस गायत्री देवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी काही योजनांसाठी निधी देण्याची घोषणा केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी काठावरील २०० देवस्थांना जोडणाऱ्या अष्टशताब्दी मार्गासाठी २३४ कोटी रुपये, जालना येथे रेशीम पार्क शेतीच्या प्रशिक्षणासाठी २५ कोठी, परभणी- गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी देत ५० कोटी रुपयांची तरतूद, माहुरगडच्या विकासासाठी ८२९ कोटी १३ लाख रुपयांचा मंजुरी यासह परळी वैजिनाथ आयटीआयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी १५ कोटी, धाराशिव जिल्ह्यातील सोनारी भैरवनाथ देवस्थान आरखड्यासाइी १८६ कोठी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. १४३४ कोटी रुपयांच्या नव्या योजनांना मंजुरी दिल्याच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.

हेही वाचा >>> BJP leaders : हरियाणात भाजपा नेत्यांविरोधात निदर्शनं; शेतकऱ्यांचा रोष भाजपाला भोवणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका बाजूला तरतुदीच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकत मराठवाडा मुक्ती दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. मराठवाड्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात करण्यात आलेल्या घोषणांचे काहीच होत नाही, असा सूर मराठवाड्यातून ऐकालया येतो आहे. शिवसेने तर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसला. मुख्यमंत्री शिंदे यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये यश आले. मात्र, मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. या पार्श्वभूमीवर निधींच्या घोषणांचा जोर सत्ताधारी मंडळींनी वाढवला आहे. मात्र, केलेल्या घोषणांचे शासन निर्णयही निघाले नाहीत, असे शासकीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांना लेखी कळवले आहे. असे असले तरी नव्या घोषणा होत असल्याने शिवसेनेकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.