नागपूर : विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान वाढल्याने काँग्रेसचा विजयाबाबतचा विश्वास दुणावला आहे. सोबतच निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.

हेही वाचा : कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राज्यपालांची भूमिका निर्णायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात सरासरी ४ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतटक्का वाढतो, असा काँग्रेसचा दावा आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा काँग्रेसला मिळतील, असा या पक्षाला विश्वास आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेचीही जबाबदारी आहे.