मुंबई: महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गेल्या १८ वर्षांपासून झटणाऱ्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाचे इंजिन पुन्हा एकदा यार्डातच रुतले आहे.विधानसभेच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालात पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील आणि ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह पक्षाच्या सर्वच १२५ उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून अनेक उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. त्यामुळे १५ व्या विधानसभेत मनसेचे अस्तित्वच राहणार नसल्याने येत्या काळात पक्षाचे अस्तिव टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्यासमोर असेल.

हेही वाचा :मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याशी सुरू झालेला संघर्ष आणि पक्षात होणारी घुसमट याला वैतागलेल्या राज ठाकरे यांनी जानेवारी २००६मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत मार्च महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांचा करिष्मा आणि पक्षातील तरुणांची फळी, मनसेच्या विविध आंदोलनाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दणदणीत यश मिळाले होते.