आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रूपात एकत्र आले आहेत. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल (राजद) यांसारख्या पक्षांचाही या आघाडीत समावेश आहे. बहुजन समाज पार्टीने (बसपा) मात्र इंडिया आघाडी, तसेच भाजपा अशा दोघांपासूनही अंतर राखलेले आहे. बसपाच्या सर्वेसर्वा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मात्र इंडिया किंवा एनडीए सामील होण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार- मायावती यांनी जरी या दोन्ही आघाड्यांशी अंतर राखलेले असले तरी त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून मात्र, बसपानं इंडिया आघाडीत सामील व्हावं, अशी भूमिका घेतली जात आहे.

“बसपानं इंडिया आघाडीत सामील व्हावं”

दलित जाटव हे बसपाचे पारंपरिक मतदार आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये जिंकायचं असेल, तर त्या पारंपरिक मतदारांपेक्षा अन्य मतदारांपर्यंतही पोहोचावं लागेल, असे बसपाच्या नेत्यांना वाटते. “अन्य मतदारांपर्यंत पोहोचणं तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आमचा पक्ष इंडिया आघाडीत सामील होईल. भाजपाला पराभूत करण्यासाठी इतर सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं वैयक्तिक मत आहे,” असे जौनपूरचे खासदार श्यामसिंह यादव यांनी सांगितले. शेवटी मायावती जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य असेल. विरोधक विभागले गेले, तर त्याचा फायदा भाजपालाच होईल, असेही श्यामसिंह म्हणाले.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

“एकट्यानं निवडणूक लढवल्यास बसपाला फटका”

“सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, इंडिया आघाडीशी हातमिळवणी करणं योग्य राहील. बसपानं एकट्यानं निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा भाजपाला होईल. विशेष म्हणजे त्याचा फटका इंडिया आघाडीलादेखील होईल. दुसरीकडे एकट्याने निवडणूक लढवल्यास बसपालादेखील फटका बसेल. कारण- मुस्लीम मतदार काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल या पक्षांना मतदान करतात. त्यामुळे बसपानं एकट्यानं निवडणूक लढवली तरी मुस्लिमांचे मतं मिळणार नाहीत,” असे बसपाचे दुसरे खासदार म्हणाले.

२०१९ मध्ये १० जागांवर विजय

बसपाची कधी काळी उत्तर प्रदेशची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१२ सालापासून या पक्षाचा जनाधार कमी होत गेला. २०१९ सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बसपाला लोकांनी आपलेसे केले. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बसपाने एकूण ८० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यातील १० जागांवर बसपाचा विजय झाला. या निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टी आणि आरएलडी यांच्याशी बसपाने युती केली होती. सध्या लोकसभेत बसपाचे एकूण नऊ खासदार आहेत. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बसपाला उत्तर प्रदेशमध्ये २०; तर मध्य प्रदेशमध्ये एका जागेवर विजय मिळाला होता. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता.

बसपाचा जनाधार घटला

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर बसपाने समाजवादीसोबतची युती तोडली आणि उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक एकट्याने लढवली. या निवडणुकीत बसपाला फक्त एक जागा मिळाली. २०१९ सालच्या विधासनभा निवडणुकीत बसपाला १२ टक्के मते मिळाली होती. २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीत बसपाने तब्बल २०६ जागांवर विजय मिळवीत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी बसपाला ३०.४३ टक्के मते मिळाली होती. २०१२ सालच्या विधासनसभा निवडणुकीत बसपाच्या विजयी उमेदवारांची संख्या २०६ वरून ८० पर्यंत खाली आली होती. त्या निवडणुकीत बसपाला तेव्हा २५.९५ टक्के मते मिळाली होती. २०१७ सालच्या निवडणुकीत बसपाला फक्त नऊ जागा जिंकता आल्या आणि मतांची टक्केवारी २२.२३ टक्क्यांपर्यंत घसरली.

दरम्यान, बसपाने इंडिया आघाडीत सामील व्हावं, असे म्हटले जात असले तरी मायावती नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.