राजस्थानमध्ये सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. एमआयएम पक्षदेखील या निवडणुकीत उडी घेण्याची शक्यता आहे. तशी तयारीही एमआयएमने सुरू केली आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी मागील काही दिवसांपासून येथे सभांचा धडाका लावला आहे. आपल्या भाषणाच्या माध्यमातून ते मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा >>> आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण काँग्रेसला खरंच शक्य आहे? देशातील ‘राजकीय गणित’ नेमकं कसं आहे? जाणून घ्या

मुस्लीम समाजाने एकत्र होण्याचे आवाहान

असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या टोंक या मतदारसंघात सभा घेतल्या. या सभेमध्ये त्यांनी मुस्लीम समाजाला एक राजकीय शक्ती म्हणून समोर या, असे आवाहन केले. टोंक येथील सभेमध्ये ओवैसी यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा (एनएफएचएस) आधार घेत मुस्लीम समजातील शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडला. ‘एनएफएचएसच्या आकडेवारीनुसार राजस्थानमधील एकूण कुपोषित ५ वर्षांखालील मुलांपैकी मुस्लीम समाजातील मुलांचे प्रमाण हे ३२ टक्के आहे. राजस्थानमध्ये हे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे,’ असे ओवैसी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “…तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचा नक्की पराभव होणार,” ममता बॅनर्जींचा दावा!

तेलंगाणामध्ये आमचा एकही मंत्री नाही, पण…

ओवैसी यांनी राजस्थानमध्ये मुस्लीम समाजाच्या विकासासाठी योग्य तो निधी दिला जात नाही, असा आरोप केला. ‘राजस्थानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के आहे. ही लोकसंख्या ७० ते ८० लाखांच्या घरात आहे. तर तेलंगामामध्ये ही संख्या ४५ लाख आहे. मात्र तेलंगाणामध्ये अल्पसंख्याकांच्या विकासासाठी १७२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये फक्त ४८० रुपये देण्यात आले आहेत,’ अशी माहिती ओवैसी यांनी दिली. तसेच ‘तेलंगाणामध्ये एमआयएमचे एकूण ७ आमदार आहेत. येथे आमचा एकही मंत्री नाही. मात्र आम्ही सरकारला तेथे निर्णय घेण्यास भाग पाडतो. ही असते राजकीय शक्ती,’ असे म्हणत त्यांनी मुस्लीम समजाला स्वत:चे राजकीय महत्त्व ओळखण्याचे आवाहन केले.

राजस्थानमध्ये एमआयएमने १५ जागा निवडल्या आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एमआयएमचे राज्य समन्वयक जमील खान यांनी आम्ही राजस्थानमध्ये निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले आहे. राजस्थानमध्ये एमआयएमने १५ जागा निवडल्या आहेत. या जागांवर एमआयएम पक्ष आपले उमेदवार उभे करू शकतो. याव्यतिरिक्त इतरही महत्वाच्या जागांवर एमआयएम पक्ष आपले उमेदवार उभे करू शकतो.